Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरात तेली समाजातर्फे विनायक बांगडे यांची लोकसभेसाठी तयारी पण?

Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर – पूर्व विदर्भात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभेची जागा तेली समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी आज 17 मार्च ला तेली समाजाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

 

17 मार्च ला आयोजित पत्रकार परिषदेत तेली समाजाचे पदाधिकारी प्रकाश देवतळे यांनी भाजप पक्षाचे आभार मानले, कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात तेली समाजाचे रामदास तडस यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, पूर्व विदर्भात काही ठिकाणी विविध निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाने तेली समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. Chandrapur Lok Sabha Constituency

वाचा – चंद्रपुरात निवडणुकीची मतमोजणी कुठे होणार?

मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष कांग्रेसने तेली समाजाची दखल घेत चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.

 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाचे विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र वेळेवर त्यांना तिकीट नाकारत उमेदवारी धानोरकर यांना देण्यात आली होती, तो राग आमच्या मनात आहे, त्याकरिता यंदा 2024 मध्ये तेली समाजाची दखल घेत कांग्रेसने तेली समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जर कांग्रेस पक्षाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही वेळेवर वेगळी भूमिका घेऊ असा इशारा सुद्धा यावेळी तेली समाजाच्या जेष्ठ सदस्यांनी दिला आहे. Chandrapur Lok Sabha Constituency

 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेली समाजाने केलेली मागणी राष्ट्रीय पक्षांना अडचणीत आणणारी आहे, याबाबत तेली समाजाने कांग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणारे पत्र लिहले आहे. तेली समाजातर्फे विनायक बांगडे यांना उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना निवडणुकीत जिंकून दाखवू असा सूर पत्रकार परिषदेत लगावण्यात आला. जिल्ह्यात तेली समाजाची संख्या लाखोंच्या वर आहे, आता कांग्रेस पक्ष तेली समाजाच्या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे शांताराम पोटदुखे यांच्यानंतर एकही खासदार तेली समाजातून प्रतिनिधित्व करायला आलेला नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेली समाजाची ही मागणी आश्चर्यकारक आहे, कारण मागच्या निवडणुकीत तेली समाजाचे राजेंद्र हजारे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना समाजाने जाहीर पाठिंबा दिला नव्हता, मात्र आजच्या स्थितीत तेली समाजाचे राजेश बेले हे लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे, मात्र त्यांच्या नावावर अप्रत्यक्षपणे समाजाने “ना” असे म्हटले आहे.

बेले यांनी आधी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरावा तेव्हा विचार करू असे म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाला देवतळे यांनी टाळले.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!