First phase of Lok Sabha elections निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली, 7 टप्प्यात होणारी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात निवडणूक पार पडणार आहे, यामध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणूक नियोजनाबाबत 17 मार्च ला दुपारी 1 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. First phase of Lok Sabha elections
वाचा – चंद्रपुरातील खुशबू ने पटकाविला सौंदर्य स्पर्धेचा मुकुट
लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी व आर्णी क्षेत्रात एकूण 18 लाख 36 हजार 314 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, ज्यामध्ये 9 लाख 45 हजार 26 पुरुष मतदार तर 8 लाख 91 हजार 240 स्त्री मतदारांची संख्या व इतर 48, सेवा मतदार 1 हजार 859, मतदान क्षेत्र 205, क्षेत्रीय अधिकारी 235 यांचा समावेश आहे. First phase of Lok Sabha elections
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार क्षेत्रात 24 हजार 120 नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे.
परदेशातील एकूण मतदार लोकसभा क्षेत्रात 8 असून 85 वर्षे व त्यापेक्षा वयाने अधिक असलेले मतदार 16 हजार 621 आहे. First phase of Lok Sabha elections
दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 9 हजार 679 असून लोकसभा क्षेत्रात विशेष मतदान केंद्राची संख्या 2 हजार 118 आहे, ज्यामध्ये पडदानशीन 196, दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र 6, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र 6, युवा मतदान केंद्र 2, आदर्श मतदान केंद्राची संख्या 10 असणार आहे. First phase of Lok Sabha elections
आदर्श आचार संहिता व निवडणूक खर्च पथकांची संख्या ज्यामध्ये फिरते निगराणी पथकांची एकूण संख्या 42, स्थायी निगराणी पथक 62, व्हिडीओ निगराणी पथक 29, व्हिडीओ पाहणी पथक 9, खर्च पथक 6 व खर्च सनियंत्रक पथकांची संख्या 6 आहे.
Evm-Vvpat चा संख्यात्मक तपशीलात BU-5289, CU – 3064 व VVPAT-3289 अशी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्राची संख्या 2 हजार 44 आहे, 6 विधानसभेतील मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून 2 हजार 453, प्रथम मतदान केंद्र अधिकारी 2 हजार 453, इतर मतदान केंद्र अधिकारी 4 हजार 905 काम करणार आहे, प्रशासनाकडे उपलब्ध असलेले एकूण मनुष्यबळाची संख्या ही 12 हजार 403 आहे. लोकसभा क्षेत्रात एकूण 18 मतदान केंद्र संवेदनशील आहे. First phase of Lok Sabha elections
सध्या पोलीस प्रशासनाकडे 154 पोलीस अधिकारी, 2 हजार 726 पोलीस कर्मचारी उपलब्ध असून पोलीस प्रशासनाने 81 पोलीस अधिकारी, 1150 पोलीस कर्मचारी व 2 हजार होमगार्ड ची मागणी केली आहे.
नागरिकांना निवडणूक काळात तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण क्रमांक 1950, आदर्श आचार संहिता कक्ष – 8788510061, C-Vigil अँप वापरावे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष साठी 07172-271617 क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
4 जूनला शहरातील वखार महामंडळ MIDC या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी ठिकाणी 1 CRPF कंपनी, SRPF व स्थानिक पोलीस अशी 3 सर्कल मध्ये सुरक्षा असणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडणार याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली.