Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात या 7 जणांनी भरला उमेदवारी अर्ज

Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application चंद्रपूर : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले.

हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शक्तिप्रदर्शन

मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पाटी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया), धानोरकर प्रतिभा सुरेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज (भारतीय जनता पार्टी) आणि अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

हे ही वाचा : वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार चंद्रपुरात राष्ट्रीय पक्षांना देणार धक्का

Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शक्तिप्रदर्शन करीत लोकसभा क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. तर इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज साध्यापणाने दाखल केला तर 27 मार्चला शक्तिप्रदर्शन करीत पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

 

Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल केली आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!