चंद्रपूर – Illegal liquor smuggling in Chandrapur अवैध मद्य विक्री व निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने आता धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
7 मार्च ला सकाळी 10 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मध्यप्रदेश राज्यातून चंद्रपूर मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात दारूची वाहतूक होणार आहे, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला. Illegal Liquor Smuggling in Chandrapur
त्यावेळी बोलेरो पिकअप वाहन संशयास्पद येत असताना दिसले, पोलिसांनी वाहनाला थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये गोवा ब्रँड दारूने भरलेल्या 180 एमएल च्या 39 पेट्या, पिकअप वाहन व मोबाईल सहित तब्बल 10 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर येथील वाहन चालक 21 वर्षीय फारुख शेख मुमताज शेख, 23 वर्षीय तुषार संतोष नेहारे यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक करीत बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे व सायबर गुन्हे शाखेचे राहुल पोंदे यांनी केली.