Leader of Opposition Vijay Wadettiwar सावली जवळ राष्ट्रीय महामार्गावरील एका रस्ते अपघातात विहीरगांव येथील तीन व्यक्तींचा अपघात मागील 22 जानेवारी रोजी झाला होता. त्यामध्ये शोभा नामदेव धारणे, यांचा घटना स्थळी, व चुलत भाऊ धर्मराज पांडुरंग गायकवाड यांचा नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर तिसरा भाचा निखील हीवराज गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता. अपघाती मृत्युने त्यामागे असलेल्या कुटुंबातील सदस्यांची हताहत लक्षात घेता ही बातमी गिरगाव येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेता ना.विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत पोहचवली.
यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंब न करताअपघात करणा-या वाहन मालकास संपर्क साधून अपघातात मृत पावलेल्या व जखमी झालेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थिती बाबत जाण करून देऊन सदर अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी सुचना दिल्या. यावर वाहन मालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मृतदांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर अपघातात जखमी याला एक लाख रुपये देण्याची कबूल केले. Leader of Opposition Vijay Wadettiwar
अवश्य वाचा – 11 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रपुरात
दिनांक 8 मार्च 2023 रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे सावली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना संबंधित ट्रक मालक यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मृतांच्या कुटुंबियांना प्रती दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच जखमी असलेल्या युवकाच्या कुटुंबीयास एक लक्ष रुपये देण्याचे कबूल करण्यात केलें.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती दिनेश चीटनुरवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, महिला अध्यक्षा उषा भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निखिल सुरुरमवार, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, पत्रकार दिलीप फुलबांदे , तथा बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.