MNS leaders join BJP पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेते भाजप पक्षात प्रवेश करीत आहे.
मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी गिरनार चौक येथील भाजप कार्यालयात लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. MNS leaders join BJP
हे ही वाचा : सुधीर भाऊ 15 वर्षात काय विकास केला? सांगा आधी
सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा मराठे यांच्या गळ्यात टाकत स्वागत केले, मराठे यांच्यासोबत मनसे तालुका उपाध्यक्ष सचिन बाळस्कर व मनसे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. MNS leaders join BJP
विजय मराठे यांनी अनेक वर्षे मनसे पक्षात काम केले आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल असा अंदाज आहे.
पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रामपाल सिंग, माजी नगरसेवक अजय सरकार यांची उपस्थिती होती.