गुरू गुरनुले
Closed CCTV cameras in the city मुल – उन्हाळ्याची चाहूल लागताच मागील वर्षी सुद्धा मुल नगरात चोरीचे प्रमाण वाढलेले होते. एका रात्री चार ते पाच घरात चोरी झाली होती. दागिने,पैसे सोबतच दुचाकी वाहन सुद्धा परंतु अजूनही चोरीचा शोध लागल्याचे दिसून आले नाही. यापूर्वीही अनेक चोऱ्या झाल्या आहेत.त्या देखील सापडल्या नाही त्यामुळे वारंवार होणाऱ्या या चोरींच्या घटनांमुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी शंका व्यक्त करीत नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे.एक लाखाच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते; परंतु, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची योग्यरीत्या देखभाल करण्यात आली नसल्याने बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. आजच्या काळात गुन्हेगारांना पकडण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. मात्र, ही यंत्रणाच बंद पडल्याने पोलिस प्रशासन गुन्हेगारांना कसे जेरबंद करणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. Closed CCTV cameras in the city
हे ही वाचा – चंद्रपूर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश
मूल शहरातील नवीन वस्तीत आज दिनांक २२मार्च पहाटे २ ते २:३० च्या दरम्यान आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या बाजुला श्री सुरेश कोलप्याकवार (कोर्टात क्लर्क आहे) यांच्या घरी प्रवेश करून समोरील मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांना आवाज येताच त्यांनी समयसूचकता दाखवत श्री आकेवार सर व अजून दुसऱ्या शेजाऱ्यांना फोन केला व दरवाजा आत मधून दाबून धरून ठेवला होता. Closed CCTV cameras in the city
हे ही वाचा – मुनगंटीवार यांनी 15 वर्षात काय काम केले? आपचा प्रश्न
त्याच क्षणी श्री आकेवार सर बाहेर येऊन आवाज दिल्या बरोबर चोर पळून गेले,ते पळून जातांना आकेवार सर यांनी प्रत्यक्ष बघितले ते चार लोक होते. तरी मूल वासीय जनतेने सावध राहावे. असे आवाहन एका व्हाट्सअप गृपवर करण्यात आले असून त्यांचे घराला लागून असलेला तिरणकर सर यांच्या सुध्दा घरी प्रवेश करून मुख्य दरवाज्याची कडी लावून ठेवले होते व खिडकी उघडून खिडकी वर ठेवलेले दोन्ही मोबाईल चोरून नेले अशा आशयाच्या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या पोस्ट त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांच्या मनातील भाव मूलमधील समस्या गृपवर फिरत आहेत. Closed CCTV cameras in the city
मुळात हा ग्रुप बोलका असल्यामुळे, नगरातील समस्या प्रशासनाच्या व पोलिसांच्या नजरेत येत आहेत. समस्यांची मांडणी तर या गृपवर होणारच आहे ,दखल घेण्यासाठी आजी,माजी नगरसेवक , नगरसेविका अधिकारी, पदाधिकारी , पत्रकार, समाजसेवक, राजकारणी मंडळी हेदेखील असावेत ,असा अंदाज बांधायला हरकत नसावी. Closed CCTV cameras in the city
आणि……. तरीही समस्या समस्याच कां राहतात हे कळायला मार्ग नाही.
माझ्यासाठी प्रश्न हा नाही तर प्रश्न असा आहे ,काही महिन्यांपूर्वीही याच भागात चोरीचा प्रयत्न झाला होता , तेंव्हा पोलिस प्रशासनाने अशाच बातम्या समाजमाध्यमांवर वायरल झाल्या असतांनाच ,असे नाहीये म्हणून वेळ निभावून नेली होती आणि पून्हा तोच तो प्रकार झाल्यावर या भागातील गस्त वाढविली आणि नंतर हा चोरीचा प्रकार बंद झाला होता , आता प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. Closed CCTV cameras in the city
हे ही वाचा – दुचाकी वाहनाला फॅन्सी क्रमांक हवा? तर ही बातमी वाचा
पोलिसांना याची माहिती मिळाली असणारच आहे ,मात्र आता आचारसंहिता लागू झाली आहे आणि चोरांनी पुन्हा एकदा घरात धडकच दिली नाही तर घरात लोक असतांनाच दार ठोठावले आहे , शेजाऱ्यांनी आवाज दिला म्हणून चोर पळून गेले, परंतू त्यापूर्वी घरातील वास्तव्यास असलेल्या व्यक्तीला सूचले आणि त्यांनी शेजारच्यांचा फोन वाजवला आणि त्यांनी तो उचलला म्हणून हे सहज शक्य झाले नाहीतर……आज केवढा अनर्थ झाला असता …क्षणभर विचार करावा,काय घडले असते?
ही घटना दिसते तेवढी सहजसाध्य नाही, त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा. सुचना देऊनही जाग न आलेल्या पोलिस विभागाच्या पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रेतीतस्करीला लगाम घालण्यासाठी मूल तालुक्यातील गोंडसावरीत धडक दिलीच आहे ,आता मूल पोलीस यावरही कार्यवाही करणार नसतील तर …. नागरिकांना जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे ……..धाव तर घ्यावी लागणार नाही ना?
कारण अनेक घटना घडतात आहे परंतू वेळीच घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जावी ही जनतेची किमान अपेक्षा आहे, त्याकडे कुणी लक्ष पुरविणार आहे काय? आणि पोलिस विभागही जागे राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.