Thursday, April 25, 2024
Homeताज्या बातम्याMukhyamantri Eknath Shinde : अम्मा ला दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला

Mukhyamantri Eknath Shinde : अम्मा ला दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला

- Advertisement -
- Advertisement -

Mukhyamantri Eknath Shinde अम्मा ने सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे. अम्माने सुरु केलेले काम राज्यासाठी प्रेरणादाई आहे. अनेकदा किशोर जोरगेवार आपल्या मातोश्री बद्दल कुतुहलाने सांगत असतात आज अम्माची भेट घेता आली. त्यांचा आर्शिवाद घेऊन मुंबईला जात आहे. आता नव्या उर्जेने काम करणार असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

वाचा – चंद्रपुरात बॉटनिकल गार्डन चे उदघाटन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौ-यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली. 2022 ला “मदर हु इंन्स्पायर पुरस्काराने अम्माला सन्माणीत करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉल वरुन शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा अम्माने त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आज अम्माच्या भेटीला आलो असल्याचे म्हणाले. Mukhyamantri Eknath Shinde

 

मुख्यमंत्री सचिव विकास खारगे, विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांचा अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यभर चर्चीला जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शहरातील गरजवंताना दररोज घरपोच जेवनाचा डब्बा पोहचविला जात आहे. Mukhyamantri Eknath Shinde

 

या कुटुंबासाठी अम्मा आधार ठरली आहे. त्यांच्या या उपक्रमाबदल अनेक संस्थानच्या वतीने त्यांना सन्माणीत करण्यात आला आहे. 2022 साली त्यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते मदर हु स्पा इंस्पायर पुरस्काराने सन्माणीत करण्यात आले. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ काँल करुन अम्माला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अम्माने त्यांना भेटीसाठी चंद्रपूरात आमंत्रित केले होते. Mukhyamantri Eknath Shinde

 

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौ-यावर असताना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली आहे. यावेळी अम्मा का टिफिन या उपक्रमाची त्यांनी पाहणी करत माहिती जाणून घेतली. हा एक अभिनव सामाजिक उपक्रम असुन राज्याला यातुन प्रेरणा मिळेल. या उपक्रमाबद्दल अनेकदा ऐकल होत. आज भेट देता आली याचा आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!