Mungantiwar lost twice in Lok Sabha elections भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुक 2024 च्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहिर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचाही समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रामधुन दिल्ली वारी करण्यासाठी पक्षाने राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ना.मुनगंटीवार यांनी इच्छुक नसल्याचे सांगीतल्यावरही उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांत काहीं खुशी कहीं गम चे वातावरण आहे.
चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे पुन्हा एकदा इच्छुक होते.त्यांच्या पाठोपाठ ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे, डॉ गजेंद्र आसुटकर (यवतमाळ) हे इच्छुक होते.मात्र यंदा पक्षाने राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली आहे. Mungantiwar lost twice in Lok Sabha elections
वाचा – चंद्रपूर ते मुंबई रेल्वे ला सुरुवात
सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी दोन वेळा (1989 व 1991)चंद्रपूर लोकसभा लढविली आहे. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यंदा मात्र चित्र पालटले आहे.यंदा 400 पारचा नारा भाजपाने दिला आहे.मुनगंटीवार हे 1995 पासून आमदार आहेत.दांडगा अनुभव व त्यांची सुक्ष्मनियोजन शैली व सर्वमान्य नेतृत्व या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी असल्याचे बोलले जात आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असुन लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली वारी केली आणी तेव्हाही त्यांनी लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते.असे असतांना उमेदवारी कां..? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. Mungantiwar lost twice in Lok Sabha elections
मुख्यमंत्र्यांना साकडे घातले पण…..
दोन दिवसांपूर्वी मंगळवारी ना सुधीर मुनगंटीवार यांनी,चंद्रपूरच्या काष्ठने निर्मित नवीन संसदभवनाच्या दारातून मला जावे लागेल की काय..?याची मला भीती वाटत आहे सांगून,ती एन्ट्री थांबविण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे घातले होते.त्यांनंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारला ना.मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा झाल्याने,पक्षाचा आदेश त्यांना आता मान्य करावा लागणार आहे.
वाचा – वनमंत्र्यांच्या विधानसभेतील धक्कादायक बातमी
त्या चर्चेला विराम मिळाला
ना.सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष महत्व त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपात आहे.त्यांच्या भावना लक्षात घेत पक्ष त्यांचे ऐकेल व उमेदवारी आ.प्रतिभा धानोरकर यांना मिळेल अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या,त्याला आता विराम मिळाला आहे.
लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी
सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढली होते, ज्यामध्ये त्यांना 1 लाख 93 हजार 397 मते मिळाली होती, त्यावेळी कांग्रेसचे शांताराम पोटदुखे यांचा विजय झाला होता, वर्ष 1991 मध्ये गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर लोकसभेत समावेश झाल्यावर मुनगंटीवार दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. Mungantiwar lost twice in Lok Sabha elections
त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 23 हजार 122 मते मिळाली, ते तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यावेळी कांग्रेसचे शांताराम पोटदुखे यांना 2 लाख 12 हजार 948 मते मिळवीत त्यांनी विजयश्री खेचून आणला, दुसऱ्या क्रमांकावर जनता दलाचे मोरेश्वर टेम्भूर्डे यांनी 1 लाख 25 हजार 251 मते घेतली.
आता सुधीर मुनगंटीवार 33 वर्षांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.