Shortage of sand in Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्ष भरापासून रेती घाटाचे लिलाव न झाल्याने नागरिकांचे मंजूर घरकुलाचे बांधकाम रेती न मिळाल्यामुळे अडचणीत आले आहे, निदान शासनाने पुढाकार घेत घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
विविध नियमात जिल्ह्यात वाळू घाट अडकले आहे, वाळू घाटाचे लिलाव झाले, त्याबाबत टेंडर सुद्धा झाले मात्र अजूनही सदर निविदा उघडण्यात आल्या नाही, त्यामुळे घरकुलाचे काम पूर्णतः बंद करण्यात आले, प्रशासनाने घरकुल मंजूर केले, आधी बांधकाम सुरू झाले मात्र वाळू बंद झाल्याने घराच्या कामात अडथळा आला. Shortage of sand in Chandrapur
घरकुल मंजूर झालेले नागरिक गरीब कुटुंबातील असल्याने ते भाड्याच्या घरात राहू शकत नाही, शासनाने ताबडतोब नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना संदीप गिर्हे यांनी केली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर क्षेत्रात वाळूचे स्टॉक विकण्याची परवानगी प्रशासनाने त्यांना दिली आहे मात्र चंद्रपूर, राजुरा, मूल, वरोरा या ठिकाणी प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली, एकीकडे न्याय तर दुसरीकडे अन्याय अशी पॉलिसी जिल्हा प्रशासनाची दिसून येत आहे.