Thursday, May 23, 2024
Homeचंद्रपूर शहरChaitra Navratri 2024 : चंद्रपुरातील माता महाकाली मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

Chaitra Navratri 2024 : चंद्रपुरातील माता महाकाली मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

- Advertisement -
- Advertisement -

Chaitra Navratri 2024 चैत्र महिण्यात भरणा-या महाकाली यात्रेला सुरवात झाली असून यात्रेत येणा-या भाविकांना 9 किलो चांदीच्या मुर्तीचे दर्शन घेता यावे या करिता श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने मंदिर परिसरात चांदीच्या पालखीसह चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते चांदीच्या मुर्तीची महाआरती व प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

यावेळी श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जैस्वाल, विश्वस्त मिलिंद गंपावार, श्याम धोपटे, राजू जोशी, रोडमल गहलोत, अशोक मत्ते, आशा महाकाले , यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडी शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, महिला आघाडी  संघटिका सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वैशाली मेश्राम, सरोज चांदेकर, कल्पना शिंदे, आशा देशमुख, नीलिमा वनकर, विमल काटकर, अस्मिता दोनाडकर, शांता धांडे, मुन्ना जोगी, चंद्रशेखर देशमुख, विनोद अनंतवार, मुकेश गाडके, प्रवीण कुलटे, करण नायर, कैलाश धायगुडे,  यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.   Chaitra Navratri 2024

 

चैत्र महिण्यात भरणा-या माता महाकालीच्या यात्रेला सुरवात झाली आहे. या यात्रेकरिता राज्यासह बाहेरील राज्यातील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल होत आहे. विशेष म्हणजे श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने यंदा 9 किलो चांदीची मुर्ती आणि चांदीची पालखी मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना चांदीच्या मुर्तीचे दर्शन घेता येणार आहे. आज महोत्सव समीतीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर मुतीची मंदिर परिसरात प्रतिष्ठापणा करण्यात आली. Chaitra Navratri 2024

Mahakali temple
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

तत्पुर्वी मंदिरा बाहेर असेलल्या श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या 51 फुट उंचीच्या ध्वजाचे ध्वजारोहण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिरात जात महाकाली मातेचे दर्शन घेतले. चांदीच्या पालखीत चांदीची मुर्ती प्रतिष्ठापना स्थळी आणण्यात आली. येथे विधीवतरित्या पुजा करुन मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरवर्षी नवरात्रो मध्ये आपण महाकाली महोत्सवाचे आयोजन करत असतो.

 

यात मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा करण्यात येते. यावेळी लाखो भाविक पालखीचे दर्शन घेतात. मात्र चैत्र महिण्यात मंदिरात येणा-या भाविकांनाही पाखलीचे दर्शन घेता यावे यासाठी यंदाच्या वर्षीपासून आपण यात्रेदरम्यान येथे पालखी आणि चांदीची मुर्ती दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. Chaitra Navratri 2024

    महोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण

 महाकाली मंदिर येथे सुरु झालेल्या यात्रेतील भाविकांना श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाप्रसादाचे वितरित करण्यात आला. यावेळी महोत्सव समीतीच्या पदाधिका-यांसह आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती. मंदिर आणि स्थानिक प्रशासनाने येथे येणा-या भाविकांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्यात.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!