Thursday, May 23, 2024
HomeराजकारणChandrapur Lok Sabha Voter List : नव्याने मतदार सर्व्हेक्षण करा - आमदार...

Chandrapur Lok Sabha Voter List : नव्याने मतदार सर्व्हेक्षण करा – आमदार किशोर जोरगेवार

- Advertisement -
Chandrapur Lok Sabha Voter List शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान पार पडले. मात्र यावेळी अनेक पात्र मतदात्यांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले असुन हे लोकशाहीच्या हिताचे नाही. त्यामुळे याची गंभीर दखल घेत पून्हा प्रत्येक घरापर्यंत पोहचून नव्याने मतदार सर्वेक्षण करत पात्र मतदारांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ठ करा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.
काल पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये अनेक पात्र मतदारांचे नाव कमी करण्यात आले आहे. मागच्या लोकसभा निवडणूक २०१९ च्या तुलनेत 53 हजार 338 मतदारांचे नाव वगळण्यात आले आहे.  अनेक पात्र मतदारांचे मतदार ओळखपत्र असतांना व ते मागील अनेक निवडणुकीमध्ये मत देत असतांना सुध्दा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना यावेळच्या निवडणुकीमध्ये  मतदान करता आले नाही. Chandrapur Lok Sabha Voter List
लोकशाही बळकटीकरण करीता प्रत्येक पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. परंतु हयात असलेले आणि पात्र मतदारांचे नाव वगळण्यात आले आहे. यामध्ये वयोवृद्ध नागरिक व महिलांना नाव शोधण्यास अडचण होत असून मतदार यादीत  नाव नसल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. Chandrapur Lok Sabha Voter List
काल दिवसभरच मतदार यादीत नाव मिळत असल्याच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. यावेळी आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना याबाबत अवगत केले होते. त्यामुळे  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  मध्ये वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता विशेष प्रयत्न करून पात्र व नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समविष्ट करणे प्राधान्याने आवश्यक असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले आहे. Chandrapur Lok Sabha Voter List
तसेच  प्रत्येक घरापर्यंत जाऊन नव्याने मतदार सर्वेक्षण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही  त्यांनी जिल्हाधिकारी  विनय गौडा यांना केल्या आहे.
RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!