Chandrapur Lok Sabha Total Vote : चंद्रपुर लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय मतदान किती?

Chandrapur Lok Sabha Total Vote चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

हे ही वाचा –चंद्रपुरात उष्माघाताचा धोका, ही काळजी घ्या

विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. Chandrapur Lok Sabha Total Vote

हे ही वाचा – चंद्रपुरात मतदान केंद्रावर गोंधळ, बघा हा व्हिडीओ

शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. Chandrapur Lok Sabha Total Vote

Total voting percentage
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एकूण विधानसभा मतदार निहाय यादी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

विधानसभा निहाय एकूण मतदान..

चंद्रपूर विधानसभा एकूण मतदार – 3 लाख 56 हजार 736 – एकूण मतदान – 2 लाख 8 हजार 426

राजुरा विधानसभा एकूण मतदार -3 लाख 13 हजार 611, एकूण मतदान – 2 लाख 19 हजार 800

बल्लारपूर विधानसभा एकूण मतदार – 3 लाख 1 हजार 242, एकूण मतदान – 2 लाख 5 हजार 915, 

वरोरा विधानसभा एकूण मतदार – 2 लाख 71 हजार 985, एकूण मतदान – 1 लाख 84 हजार 226

वणी विधानसभा एकूण मतदार – 2 लाख 79 हजार 899, एकूण मतदान – 2 लाख 4 हजार 988

आर्णी विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार – 3 लाख 14 हजार 433, एकूण मतदान – 2 लाख 18 हजार 597

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!