Chandrapur Loksabha Election Day : चंद्रपूर लोकसभेची निवडणूक, मतदार यादीतून नाव गहाळ आणि गोंधळ

Chandrapur Loksabha Election Day चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 5 या वेळेत 55.11 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 49.70 टक्के मतदान झाले.

हे ही वाचा – चंद्रपुरातील सामान्य नेता

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 लक्ष 26 हजार 229 पुरुष मतदारांनी (55.64 टक्के), 4 लक्ष 86 हजार 708 स्त्री मतदारांनी (54.56 टक्के) तर पाच इतर नागरिकांनी (10.42 टक्के) असे 10 लक्ष 12 हजार 942 (55.11 टक्के) मतदारांनी मतदान केले. Chandrapur Loksabha Election Day

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. Chandrapur Loksabha Election Day

 

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची गर्दी दिसून आली. तसेच पहिल्यांदाच मतदान करणा-यांमध्ये उत्साह निदर्शनास आला. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापन मतदान केंद्र, युवा कर्मचारी व्यवस्थापन मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.

 

जिल्हाधिकारीही मतदानासाठी रांगेत : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सहपरिवार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सुरवातीला मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर मतदान करण्यासाठी ते स्वत: रांगेत उभे राहिले. Chandrapur Loksabha Election Day

 

18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रशासनाचे ढिसाळ नियोजन चर्चेत राहिले

यामध्ये सर्वात मोठी अडचण ही मतदारांची झाली, मतदान केंद्रावर पोहचल्यावर अनेक मतदारांची नाव यादीत नसल्याने संभ्रम वाढला, काही मतदार ह्यात असताना त्या मृत दाखविण्यात आल्या तर काहींच्या नावा समोर डिलीट शब्दाचा उल्लेख होता, शहरातील बगड खिडकी येथील प्रियदर्शिनी शाळेत काहींनी बोगस मतदान केलं असल्याचा आरोप नागरिकांनी लावला, या बुथवर तब्बल 250 नागरिकांची नावे गहाळ झाली होती, नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर त्या बुथवर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांतर्फ कादर शेख यांनी प्रशासनासमोर आपली बाजू मांडली.

 

बाबूपेठ, ज्युबिली शाळेतील ईव्हीएम मशीन काही काळ बंद राहिल्याने त्याठिकाणी 1 ते 2 तास मतदान उशिरा सुरू झाले. Chandrapur Loksabha Election Day

 

लोकसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार मिलिंद दहिवले यांच्या आईचे नाव यादीतून गहाळ झाले त्यावेळी दहिवले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा त्यांच्याकडे दाद मागितली मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली.

 

चंद्रपूर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना भर उन्हात मतदान केंद्रावर वोलेंटियर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, सकाळी 7 वाजेपासून विद्यार्थी दिव्यांग व 80 वय वर्षे नागरिकांना मतदान करण्यासाठी घेऊन जात होते, प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात प्रशासनाने नाहक त्रास दिला, काही ठिकाणी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण सुद्धा मिळाले नाही.

मतदानाच्या दिवशी सकाळी वरोरा येथील लोकमान्य टिळक शाळेतील मतदान केंद्रावर महाविकास आघाडी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केले, त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी मतदानाचा हक्क बजावला, दुपारी 12 वाजेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापाठोपाठ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!