chandrapur police conviction rate 12 एप्रिल 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा तालुक्यातील मौजा चेक नवेगाव येथील शेत शिवारात गीता दीपक कन्नाके ची दगडी फरशीच्या तुकड्याने वार करीत हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी आरोपी सासरे 52 वर्षीय भुजंग झित्रू कन्नाके ला पोम्भूर्णा पोलिसांनी अटक केली होती.
हे ही वाचा : चंद्रपुरातील मतदारांना धमकी?
आरोपी भुजंग चा सून गीता सोबत घरगुती कारणावरून वाद होत भांडण झाले होते, त्यामधून आरोपीने गीता ची हत्या केली. chandrapur police conviction rate
3 वर्षे न्यायालयात चाललेल्या या प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपी भुजंग कन्नाके ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. chandrapur police conviction rate
हे ही वाचा : आता रेशन कार्ड वर मिळणार ब्रँडेड दारू
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दादाजी ओलालवार यांनी करीत आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून सीमा रामटेके यांनी काम बघितले, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय तर्फे 1 एप्रिल रोजी देण्यात दिली.