Chandrapur voter list : पत्नीचे नाव मतदार यादीत मात्र पतीचे नाव गहाळ

Chandrapur voter list बल्लारपूर शहरातील श्रीराम वार्ड येथे राहणारे प्रशांत गद्दाला यांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाल्याने त्यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा याना निवेदन दिले आहे.

ही बातमी अवश्य वाचा : महायुती सरकारने केला घोळ, RTE चे नियम बदलले, शिक्षणाचा अधिकार हिरावला

मागील 5 ते 6 निवडणुकीत गद्दाला यांनी मतदान केले आहे, मात्र वर्ष 2024 च्या मतदार यादीत माझे नाव गहाळ झाले, याबाबत मी तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो मात्र मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे अशी प्रतिक्रिया गद्दाला यांनी दिली. Chandrapur voter list

अवश्य वाचा – मतदार यादीतून नावे गहाळ, मतदान केंद्रावर झाला गोंधळ

विशेष म्हणजे मी माझ्या पत्नीचे नाव दीड महिन्यांपूर्वी मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता, पत्नीचे नाव मतदार यादीत आले मात्र माझं नाव आले नाही, प्रशासन मार्फत झालेली ही चूक आहे पण ते मान्य करीत नाही अशी प्रतिक्रिया गद्दाला यांनी दिली. Chandrapur voter list

मतदानापूर्वी गद्दाला यांनी जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन दिले होते, मात्र मतदानाच्या दिवशी लोकसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाले होते, काही मतदान केंद्रावर याबाबत गोंधळ उडाला होता, मतदार जिवंत असून त्याना मृत दाखविण्यात आले, मतदार सर्व्हेक्षनात मोठी चूक झाली मात्र प्रशासन आपली बाजू मांडत नागरिकांनी आक्षेप घ्यायला हवा होता असे सांगत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!