Ballarpur Assembly शिवसेना प्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर व मुल तालुक्यातील जनतेच्या सेवार्थ नागपूर येथे शिवसेनेच्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
ही बातमी अवश्य वाचा : चंद्रपुरातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश
रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण केले. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. ते म्हणाले की आज रुग्णवाहिका बघितल्यानंतर आम्हाला जुना काळ आठवला, शिवसैनिकाची ओळख ही कसलंही संकट येवो, झोकून काम करुन नागरिकांना मदत करणं ही आहे, असं म्हणत शिवसैनिकांचं मनोबल उंचावण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. Ballarpur Assembly
चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या सामाजिक,पक्ष संघटनेच्या कामाबद्दल उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं, काम करताना शिवसैनिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. Ballarpur Assembly
रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम, उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, शलिक फाले, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहरे,चंद्रपूर प्रमोद पाटील,तालुका प्रमुख आशिष कावटवार,प्रकाश पाठक, प्रशांत गड्डूवार,विकास विरूटकर,सूरज माडूरवार आदींची उपस्थिती होती.
राजकीय बातमी : 2 नगरसेवकांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
सदर रुग्णवाहिका 24 एप्रिल शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल व बल्लारपूर तालुक्यासाठी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे, ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे.