Chor bt seeds : चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात 1 कोटीचे चोर बीटी बियाणे जप्त

Chor bt seeds गोंडपिपरी – गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने दि 23 गुरुवारी रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले.

अवश्य वाचा : निराधार महिलेला पुन्हा दिला अम्माने आधार

अनाधिकृत चोर बेटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही .कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.

महत्वाची बातमी : मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत

Chor bt seeds शेतकऱ्यांना चोर बिटि विक्री करून फसवणूक केली जात आहे.या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग,पोलीस विभाग हे अलर्ट आहेत.ठाणेदार रमेश हत्तिगोटे, मणोहर मत्ते व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दि.२३ रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (24) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्रमांक MH 34 एम 8635 वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे 12.90 क्विंटल 25.80 लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले.

 

Chor bt seeds संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. दि. (24)शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत,विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत,उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे,श्रावण बोढे,विवेक उमरे,पोहवा देविदास सुरपाम,मनोहर मत्ते,शांताराम पाल, प्रशांत नैताम,पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

12 वी नंतर हे अभ्यासक्रम निवडाल तर मिळेल भरघोस पगार

Chor bt seeds आपल्या परिसरात संशयास्पद अनधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर याची माहिती कृषी विभागाला द्यावी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे रासायनिक खते व कीटकनाशक खरेदी करावे .खरेदी केल्याचे पक्की बिल शेतकऱ्यांनी जपून ठेवावे.

-सचिन पानसरे ,तालुका कृषी अधिकारी गोंडपिंपरी

 

Chor bt seeds 15 मे रोजी कृषी विभागाने पोम्भूर्णा तालुक्यातील मौजा नवेगाव मोरे येथे धाड टाकून अनधिकृत कपाशी बियाणे 80.30 किलोग्राम किंमत 2 लाख 3 हजार 640 रुपये, तर दुसऱ्या दिवशी 16 मे रोजी पोम्भूर्णा भीमणी येथे 39.88 क्विंटल अनधिकृत कपाशी बियाणे किंमत 76 लाख 57 हजार असा 2 दिवसात 78 लाख 60 हजार 640 रुपयांचे कापूस बियाणे जप्त केले, 23 मे मध्यरात्री गोंडपीपरी पोलिसांनी एकूण 12.90 क्विंटल कापूस बियाणे किंमत 25.80 लाख रुपये जप्त केला

आतापर्यंत पोलीस व कृषी विभागाच्या कारवाईत एकूण 1 कोटी 4 लाख 640 रुपयांचे कापूस बियाणे पकडले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!