Thursday, June 20, 2024
Homeचंद्रपूर शहरAmma Ki Dukan : निराधार महिलांचा आधार, अम्मा की दुकान

Amma Ki Dukan : निराधार महिलांचा आधार, अम्मा की दुकान

- Advertisement -
- Advertisement -

Amma ki dukan निराधार महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अम्मा कि दुकान उपक्रम राबविल्या जात असून सदर उपक्रमा अंतर्गत जलनगर येथील प्रिती मसराम या महिलेला दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळले

गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या हस्ते सदर अम्मा कि दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकरआशा देशमुखनिलिमा वनकरयुवती प्रमूख भाग्यश्री हांडेरुबीना शेखवनिता गाताडेसंगीता धुर्वेचंद्रशेखर देशमुख, सतनाम सिंह मिरधाअनिल गाताडे आदींची उपस्थिती.

महत्वाचे : मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत

Amma ki dukan आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत निराधार गरजुंना दररोज जेवणाचा टिफिन पोहोचविले जात आहे. हा उपक्रम चालवत असतांना अनेक निराधार महिलांमध्ये व्यवसाय करण्याची जिद्द आहे. मात्र भांडवल नसल्याने त्यांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अम्मा कि दुकान हा उपक्रम सुरु करण्याचा निर्धार आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारासाठी अम्मा कि दुकान देण्यात आली आहे. तर शहरात निराधार महिलांना सदर दुकान दिल्या जात आहे.

अत्यन्त महत्त्वाचे : यशस्वी व्हायचंय तर हे कोर्स नक्की करा

Amma ki dukan या अगोदर सदर उपक्रमाअंतर्गत बंगाली कॅम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला अम्मा का दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आज शहरातील दुस-या अम्मा कि दुकानचे उद्घाटन अम्माच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रिती मसराम या महिलेला हे दुकान देण्यात आले असून जलनगर परिसरात हे दुकान सुरु करण्यात आले आहे.

 

आपण दुकान उपलब्ध करुन देत आहोत. आता प्रामाणिक पणे कष्ट करुन यातुन आर्थिक उत्पन्न मिळवामी सुध्दा आजही टोपल्या विकते. मेहनतीने मिळविलेल्या कमाईचा आनंद अधिक आहे. हिच खरी श्रीमंती आहे. या दुकानाच्या माध्यमातून आणखी एक दोन जनांना आपण रोजगार द्यावा. सुखी संसार करावा असे यावेळी अम्मा म्हणाल्या.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!