Drugs in Chandrapur : शहरातील बाबूपेठ भागात अंमली पदार्थ? आपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

Drugs in Chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजेच बाबूपेठ मात्र या भागात सध्या गुन्हेगारी फोफावत आहे, याला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे. मात्र तसे काही होताना दिसत नसल्याने आप ने याविरोधात आवाज उठविला आहे.

Bamboo Research and Training Centre : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशातील अग्रगण्य संस्था बनविणार – सुधीर मुनगंटीवार

या भागात दिवसाढवळ्या रेती चोरी होत आहे इतकेच नाही तर अंमली पदार्थ सेवन करणारे अल्पवयीन मुले घरफोड्या करत आहे. घरासमोरील वाहने चोरीला जात आहेत. सध्या शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतांना कोणाचेही याकडे लक्ष नाही. पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. याबाबत आपचे युवा नेते राजू कुडे यांनी स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनला एक निवेदन सादर केले आहे.

बाबूपेठ परिसरातील काही भागात चोरी, अंमली पदार्थांची तस्करी असे अनेक अवैध उद्योग फोफावत आहे, मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, जर आज यावर आवाज उचलला नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर निघून जाणार.

मात्र आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सदर प्रकरणाची गांभिर्यता लक्षात घेत त्याबाबत सखोल माहिती जाणून घेत पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती व्हावी व प्रशासनाने काहीतरी कारवाई यावर करावी असे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

पोलीस प्रशासन हा विषय कसा हाताळणार यावर बाबूपेठ येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अवश्य वाचा – PM विश्वकर्मा मार्गदर्शन कार्यक्रम

Drugs in Chandrapur शहरातील गुन्हेगारीला तातडीने आळा घालण्याची मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे. निवेदन देते वेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक महानगरचे अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष जावेद सय्यद, व प्रशांत रामटेके उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!