Semi english medium zp school : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 24 शाळेत सेमी इंग्लिश वर्ग सुरू

Semi english medium zp school जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यास सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून परवानगी देण्यात आली आहे.

अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

जिल्हा परिषद व्यवस्थापनेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुले दाखल करण्याचा दिसून येतो.  त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीकडून मागणी प्राप्त होती.

 

Semi english medium zp school सदर मागणीचा विचार करता तसेच इंग्रजी भाषेची निकड लक्षात घेता सन 2024-25 या सत्रापासून एकूण 24 जिल्हा परिषद  शाळांत विविध वर्गांना सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा : हा अभ्यासक्रम निवडा आणि मिळवा लाखांचे पॅकेज

त्यात विज्ञान व गणित हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविण्यात येणार असून त्याचा लाभ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांत होणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!