Smart electricity recharge meter केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचे जुलमी धोरणामुळे राज्यातील सर्व सामान्य गरीब जनता त्रस्त झाली आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे बल्लारपूर येथील वीज ग्राहकांचे चालू असलेले पोस्टपेड मीटर बदलवून त्याऐवजी स्मार्ट व प्री-पेड मीटर लावण्याच्या सक्तीचा उपक्रम चालू केला आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरात युवासेनेने साजरा केला आदित्य उत्सव
नवीन स्मार्ट प्री-पेड वीज मीटर वीज ग्राहकांची आर्थिक लूट करणारे असून अनेक प्रकारे त्रासदायक आहेत. स्मार्ट प्री-पेड मीटर मध्ये वीज ग्राहकाने जमा केलेली रक्कम संपताच वीज खंडित होणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या अनयाय विरुद्ध चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे नेतृत्वात बल्लारपूर येथे शिवसेना कार्यालय बल्लारपूर ते उपविभागीय कार्यालय बल्लारपूर पर्यंत पदयात्रा काढून १४ शेतकऱ्यांनी मुंडन केले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व वीजमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा प्रतीकात्मक दहन करण्यात आला.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 24 जिल्हा परिषद शाळेत आता सेमी इंग्लिश अभ्यासक्रम
Smart electricity recharge meter यावेळी संदीप भाऊ गिऱ्हे यांनी बल्लारपूर शहरातील नागरिकांना आव्हान केले की वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र सरकार तर्फे नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवायची असेल तर वीज ग्राहकांनी स्मार्ट प्री-पेड मीटर लावण्यास विरोध करावा.
शिवसेना तर्फे बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री.आसिफ राजा शेख यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
यावेळी मोर्चात प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील, तालुका समनव्यक प्रदीप गेडाम, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा शाहू, माजी नगरसेवक सरफराज शेख, प्रशांत मेश्राम, माजी नगरसेवक सागर राऊत, माजी नगरसेवक अमित पझारे, महिला जिल्हा संघटिका कल्पनाताई गोरघाटे, मनस्वी संदीप गिऱ्हे, माजी नगरसेविका रंजीता बिरे व आजी-माजी अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.