Selfie with khadda : खड्डयांसोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे

Selfie with khadda शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपूरकर जनतेला १५ ऑगस्टपर्यंत खड्ड्यांसोबतचा सेल्फी काढून पाठवायचा आहे. परिक्षकांच्या निवडीनंतर प्रथम (५ हजार), द्वितीय (३ हजार) आणि तृतीय (२ हजार) रुपयांची बक्षीसे देऊन विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाची सेल्फी विद तिरंगा स्पर्धा


Selfie with khadda चंद्रपूर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे दोन मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावर मुख्य बाजारपेठ आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांची या रस्त्यांने नेहमी वर्दळ असते. मागील महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील या दोन्ही मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यासोबतच तुकुम, बंगाली कॅम्प, सिव्हील लाईन व अंतर्गत रस्त्यांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  

योजना – लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही नागरिक जखमीसुद्धा झाले आहेत. मात्र, रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने कुणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे मनपातील अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहेत. त्यामुळे या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात चंद्रपूरकर जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन खड्ड्यांसोबतचा सेल्फी कासिफ अली (मो. ९८६००५१११), राजू खजांची (मो. ९३२६८६९०९९) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.


या क्रमांकावर पाठवा सेल्फी
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभिनव आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कासिफ अली (मो. ९८६००५१११), राजू खजांची (मो. ९३२६८६९०९९) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!