illegal liquor license Maharashtra । “दारू दुकानांच्या नावाखाली भ्रष्टाचार! आम आदमी पार्टीची SIT कडे कारवाईची मागणी”

illegal liquor license Maharashtra

illegal liquor license Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य देशी दारू व बिअर विक्री परवाने वितरित करण्यात आले. या परवान्यांचे वाटप करताना नियमानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे, जागेची वैधता, पार्किंग व्यवस्था, धार्मिक स्थळांपासूनचे अंतर आदी बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक व्यवहारांवर आधारित परवाने मंजूर करण्यात आले. illegal alcohol permits in Chandrapur

भद्रावती तालुक्यात वाळू तस्करीला अभय

बाबुपेठ परिसरात अशाच प्रकारे चार नवीन परवाने नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहेत. अनेक बार चालकांकडे वाहन पार्कींगची कोणतीही व्यवस्था नसतानाही खोटे कागद तयार करून परवाने मिळविण्यात आले आहेत. काही मध्यविक्री दुकाने धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ असूनही त्यांना नियम झुगारून परवाने देण्यात आले. ही गंभीर बाब असून त्यास जबाबदार असलेल्या तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) याची गंभीर दखल घेऊन अशा सर्व नियमबाह्य परवाने रद्द करावेत, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आम आदमी पार्टीची जोरदार मागणी आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, महिला शहराध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment