Municipal office late staff : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – वर्ष २०१२ रोजी चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर प्रथमच १३ वर्षांनी मनपाला IAS दर्जाचा अधिकारी लाभला, मनपा आयुक्त नरेश अकनूरी यांनी पदभार संभाळल्यावर कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आतंक, एकाच दिवशी दोघांची शिकार)
१५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त अकनूरी कार्यालयात दाखल झाले, मात्र यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात आले नव्हते, कर्मचाऱ्यांसह अधिकारी कार्यालयीन वेळेत मनपात येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर मनपा आयुक्तांनी थेट मनपाचे प्रवेशद्वार बंद केले.
काही वेळानी कर्मचारी व अधिकारी मनपात दाखल झाले असता, प्रवेशद्वार बाहेरून बंद असल्याचे समजले, मनपात २ वर्षांपासून प्रशासक बसल्यावर अधिकारी व कर्मचारी पूर्णतः बेभान झाले होते, कार्यालयीन वेळेवर न पोहोचता अधिकारी आपल्या सोयीनुसार कार्यालयात येत होते. मात्र आजच्या प्रकारामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली असल्याचे चित्र दिसले. Municipal office late staff
नेहमी नागरिकांना बाहेर ताटकळत उभे ठेवणारे अधिकारी आज स्वतः बाहेर ताटकळत उभे होते. मनपा आयुक्त अकनूरी यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असे वागणे व त्यांना शिस्त लावण्याचा हा प्रकार दिवसभर जनमानसात चर्चेत होता.










