nylon manja sale raid : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर चंद्रपूर जिल्हातील पोलीस प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम करीत आहे. सदर धंदा पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी विक्रेते नायलॉन मांजा थेट पार्सलद्वारे मागवीत आहे. असाच एक प्रकट १५ डिसेंबर रोजी चंद्रपुरात उघडकीस आला. (नायलॉन मांजा विक्रेते स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर)
रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली कि एकाने नायलॉन मांजा बाहेरून बोलावला असून आज त्याची डिलिव्हरी होणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी जय महाराष्ट्र कार्गो मूव्हर मधून एका इसमाला नायलॉन मांजाचे पार्सल घेऊन जाताना थांबविले. गुन्हे शोध पथकाने त्या इसमाची झडती घेतली असता सदर पार्सल मधील खोक्यात ६० प्लॅस्टिक चक्री mono ktc fighter किंमत प्रत्येकी १५०० रुपये असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी २३ वर्षीय प्रतीक अरुण नागपुरे राहणार बालवीर वॉर्ड राजनला टॉकीज च्या मागे चंद्रपूर याला ताब्यात घेतले.
आरोपीवर पर्यावरण संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. nylon manja sale raid
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, हिमांशू उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, रामप्रसाद नैताम, आनंद खरात, शरद कुडे, लालू यादव, मनीषा बावणे, संदीप, पंकज पोंदे, सुरेश कोरवार, रवीकुमार ढेंगळे, प्रफुल, पंकज व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.










