Gutkha Seized Chandrapur कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला सुगंधित तंबाखू आणि गुटखा साठा.

Gutkha Seized Chandrapur | कोठारी परिसरातून 98 हजारांचा गुटखा आणि पानमसाला जप्त”

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 21, 2026

Gutkha Seized Chandrapur : कोठारी (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा करीत असून, कारवाईच्या मालिकेत गुन्हे शाखेने कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ९८ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे. (बाबुपेठचा हनुमान गुन्हे शाखेच्या जाळ्यात)

कोठारी परिसरातील Gutkha Seized Chandrapur पोलिसांची धाड

स्थानिक गुन्हे शाखेच्या राजुरा उपविभाग पथकाने २० मे रोजी हि कारवाई केली, सुगंधित तंबाखूसह गुटखा विक्रीकरिता साठवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताच्या घर आणि दुकानावर धाड टाकली.

या धाडीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध ७ कंपन्यांचे सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला असा एकूण ९८ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी ५३ वर्षीय बंडू रामदास पहानपट्टे वर कोठारी पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर व वृषभ बारसिंगे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment