Bhadravati Gambling Raid मध्ये तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

चंद्रपुरात परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्याने मारली जुगार अड्ड्यावर धाड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 15, 2026

भद्रावती: Bhadravati Gambling Raid मुळे भद्रावती शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री जाफर टी स्टॉलजवळ सुरू असलेल्या गुप्त जुगार अड्ड्यावर चंद्रपूरचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेते यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ‘तीन पत्ती’ जुगार खेळणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. (११२ वर कॉल, ४ लोक दारू पिऊन दगावले, पोलिसांची धावपळ)

१५ जून २०२६ रोजी मध्यरात्री भद्रावती शहरात एका गुप्त जुगार अडड्यावर चंद्रपूरच्या परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेते यांनी पथकासह धडक कारवाई केली. जाफर टी स्टॉलजवळील एका बंद खोलीत पैशांची हारजीत लावून ‘तीन पत्ती’ खेळणाऱ्या ४ जुगारी तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून नगदी रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Bhadravati Gambling Raid मध्ये पोलिसांना गुप्त माहिती कशी मिळाली?

भद्रावती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बेसरकर हे रात्रीच्या गस्तीवर तैनात असताना, मध्यरात्री अंदाजे १२:३० वाजताच्या सुमारास चंद्रपूरचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेते यांना एका गुप्त बातमीदाराकडून भद्रावती येथील जाफर टी स्टॉलसमोरील एका इमारतीमध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी भद्रावती पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले आणि त्यानुसार सपोनी मिश्रा, ग्रे. पोउपनी पठाण, पोलीस अंमलदार खुशाल आणि प्रफुल हे तातडीने जाफर टी स्टॉलजवळ पोहोचले.

कारवाईची गोपनीयता राखत पोलिसांनी राकेश नामदेव कामटकर आणि गणेश दिनंकर दाते या दोन स्थानिक मजुरांना भद्रावती टप्पा येथून बोलावून पंचा म्हणून सोबत घेतले. यानंतर पोलीस उपअधीक्षक सचिन खेते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस पथकाने रस्त्याच्या पलीकडच्या संशयास्पद इमारतीकडे कूच केले. इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली रूम रिकामी आढळली, मात्र दारातून दुसऱ्या रूममध्ये प्रवेश करताच तिथे चार इसम गोल घोळका करून बसले होते आणि त्यातील एकाच्या हातात ५२ ताश पत्ते होते.

पोलिसांना अचानक समोर पाहून त्यांनी पत्ते टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलीस कर्मचाऱ्यांनी चौघांनाही जागीच घेरून ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी पैशांची हारजीत लावून ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत असल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्तिक शरद लेडांगे (वय २३ वर्षे, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) जो शिक्षण घेत आहे, रोहित बंडुजी ढवस (वय २५ वर्षे, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) जो शिक्षण घेत आहे, पवन दिवाकर नागपुरे (वय २५ वर्षे, रा. गुरु नगर, भद्रावती) जो शिक्षण घेत आहे आणि प्रशांत बंडु चुनारकर (वय ३२ वर्षे, रा. गवराळा वार्ड, भद्रावती) जो व्यावसायिक ड्रायव्हर आहे, यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण १६,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये कार्तिक लेडांगे यांच्याकडून १४,५०० रुपये रोख, रोहित ढवस यांच्याकडून ५५० रुपये रोख, पवन नागपुरे यांच्याकडून ४५० रुपये रोख, प्रशांत चुनारकर यांच्याकडून ५०० रुपये रोख आणि जुगाराचे ५२ ताश पत्ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी सफौ महेंद्र खुशालराव बेसरकर यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने, पोलिसांनी आरोपींना नवीन फौजदारी कायद्याच्या (BNSS) कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज दिली आहे. भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणे प्रभारी अधिकारी योगेश्वर विठोबा पारधी (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची रीतसर नोंद करण्यात आली असून, पुढील तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार अनुप मनोहर अस्टुनकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment