Congress Internal Conflict Chandrapur Congress group leader dispute

चार महिन्यांतच गटनेते बदलले!; अडूर OUT, अडबाले IN

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 17, 2026

चंद्रपूर – Congress Internal Conflict मुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांच्याविरोधात १६ नगरसेवकांनी अविश्वास व्यक्त केल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्यात आली असून धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. या घडामोडीमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (महिला सुरक्षेसाठी प्रशासनाची धडक मोहीम)

चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या कांग्रेस पक्षात अंतर्गत युद्ध सुरु आहे, कांग्रेस गटनेत्यावरून सुरु झालेल्या वादाने पैकी कांग्रेस पक्षाने मनपातील सत्ता गमावली, आता पुन्हा गटनेत्यांच्या वादावरून कांग्रेस पक्ष पुन्हा चर्चेत आला आहे, २७ पैकी १६ नगरसेवकांनी पैकी गटनेता राजेश अडूर यांच्या विरोधात अविश्वास दाखवीत त्यांची पदावरून हकालपट्टी केली. असा आदेश विभागीय आयुक्त तर्फे १७ जून रोजी काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे आमदार वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसला आहे.

Congress Internal Conflict मुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये खळबळ

अनेक वर्षांनी कांग्रेस पक्षाने मनपा निवडणुकीत मुसंडी मारली मात्र १ मताने कांग्रेस चा सत्ता स्थापनेत पराभव झाला होता, ऐनवेळी शिवसेना ठाकरे यांनी भाजप सोबत घरोबा करीत कांग्रेसला सत्तेबाहेर ठेवले. ६ फेब्रुवारी ला राजेश अडूर यांची गटनेता पदी निवड झाली, स्थायी समिती सदस्य निवडीत त्यांनी धानोरकर गटाच्या एकाही नगरसेवकांना संधी दिली नाही, त्यामुळे धानोरकर-वडेट्टीवार गटात पुन्हा अंतर्गत कलह सुरु झाला.

सध्या चंद्रपूर मनपाचा कारभार रामभरोसे सुरु आहे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मनपा अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, राज्य व देशात कट्टर विरोधक शिवसेना ठाकरे व भाजपने चंद्रपुरात युती केली, त्यामुळे विरोधी व सत्तेत असलेल्या नगरसेवकांची कामे रखडलेली आहे.

४ महिन्यांनी २७ पैकी १६ कांग्रेस नगरसेवकांनी गटनेता राजेश अडूर यांच्यावर अविश्वास ठराव पारित करीत थेट विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेतली. आपली उचलबांगडी होणार अशी माहिती होताच अडूर यांनी समाजमाध्यमांवर मी दलित आहो म्हणून माझ्यावर अन्याय होत आहे अशी भूमिका घेतली होती.

मात्र कांग्रेस नगरसेवकांनी एकमत करीत सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदावर निवड केली, चंद्रपूर मनपातील सत्तेच्या चक्रव्यूहात काय बदल घडणार हे आता येणारी वेळच सांगेल. कारण हा कांग्रेस पक्षातील गटबाजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. सत्तेच्या जवळ असलेली कांग्रेस सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार हे निश्चित झाले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment