चंद्रपूर – (Chandrapur Congress Group War) मुळे चंद्रपूर मनपातील राजकारण आणि गटबाजीची चर्चा आता संपूर्ण राज्यभर पसरली आहे. मनपामध्ये सध्या काँग्रेस पक्षांतर्गत गटनेतेपदावरून वाद कमालीचा उफाळला आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत आमदार विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक अनुपस्थित राहिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही सुनावणी आता १३ जुलै रोजी होणार असून स्वीकृत नगरसेवकांची निवड सध्यातरी पूर्णपणे खोळंबली आहे.
Chandrapur Congress Group War: मनपात राजकीय चढाओढ
हायकोर्टाने १९ जुलै च्या आता विभागीय आयुक्तांना कांग्रेस गटनेत्यांच्या वादावर निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहे, ९ जुलै रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात धानोरकर गटाचे १६ नगरसेवक उपस्थित होते, मात्र वडेट्टीवार गटाकडे अपुरं ११ नगरसेवक असल्याने त्यांनी आज आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणे टाळले. नगरसेवकांचे संख्याबळ कमी असल्याने त्यांनी सोमवार पर्यंत आयुक्तांना वेळ मागितला अशी माहिती आहे. १३ जुलै रोजी मनपा गटनेता पदाचा वाद सुटणार अशी चिन्हे आहे. (चंद्रपुरात आता शासकीय नर्सिंग कॉलेज, मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश)
मनपा निवडणुकीचा निकाल लागल्यावर कांग्रेस पक्षात स्वतःच्या नगरसेवकांची पळवापळवी सुरु झाली होती, प्रतिभा धानोरकर यांनी सुरेंद्र अडबाले यांना गटनेतेपदी नियुक्त केले होते, यावर वडेट्टीवार गटाने आक्षेप घेत राजेश अडूर यांची निवड केली. अडूर यांची निवड झाली मात्र त्यांनी धानोरकर गटातील नगरसेवकांना स्थायी समिती मध्ये स्थान दिले नाही. त्यामुळे या दोन गटातील वाद अधिक वाढला होता.
खासदार धानोरकर यांनी वेट अँड वॉच चे धोरण अवलंबवित अचानक मोठी राजकीय खेळी खेळत अडूर यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. यावर वडेट्टीवार गटाने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने या वादाचा तोडगा विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असे निर्देशित केले होते. आज झालेल्या सुनावणीत धानोरकर गटाजवळ पुरेसे संख्याबळ आहे, त्यामुळे गटनेतेपदाचा निर्णय हा धानोरकर यांच्याच बाजूला लागणार अशी दाट शक्यता आहे. येणाऱ्या काळात वडेट्टीवार गटातील काही नगरसेवक हे धानोरकर यांच्या गोटात सामील होणार अशी माहिती आहे.
कांग्रेस पक्षाच्या या वादामुळे चंद्रपूर मनपात स्वीकृत नगरसेवक निवडीवर ग्रहण लागले आहे, इच्छुक भावी स्वीकृत नगरसेवक कांग्रेसच्या वादावर कधी व काय तोडगा निघणार याकडे लक्ष ठेवून आहे. सध्या भावी नगरसेवकांना सोमवार पर्यंत वाट बघावी लागणार.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






