चंद्रपूर – Chandrapur Congress Corporators संदर्भात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. गटनेते राजेश अडूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मनपातील नगरसेवकांच्या कामकाजावर, पक्षशिस्तीवर आणि शहरातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. अधिकृत नोटीस देऊनही अनुपस्थित राहिलेल्या काही corporators विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चंद्रपूरच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. (कांग्रेस पक्षाचा गटनेता बदलणार)
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची एक अत्यंत महत्त्वाची आणि विशेष बैठक आज चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडली. या विशेष बैठकीसंदर्भात मनपातील सर्व २७ नगरसेवकांना अधिकृतरीत्या नोटीस जारी करण्यात आली होती, तसेच व्हॉट्सॲप संदेश व लेखी पत्राद्वारेही सर्वांना बैठकीची रीतसर माहिती देण्यात आली होती. आज झालेल्या या बैठकीला गटनेते राजेश अडूर यांच्यासह सचिन कत्याल, वसंत देशमुख, चंदाताई वैरागडे, विनोद लभाने, वैशाली चंदनखेडे, अभिषेक डोईफोडे, अनिता चोखे, करिश्मा जंगम आणि सफिया तवंगर खान हे नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर नगरसेविका संजीवनी वासेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत आपला सहभाग नोंदविला.
Chandrapur Congress Corporators बैठकीत काय ठरले?
या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान महानगरपालिकेतील प्रलंबित विकासकामांवर आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सध्या शहरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत परिस्थितीवरही उपस्थित सर्व सदस्यांनी सखोल विचारमंथन केले. अधिकृत गटनेत्यांनी नोटीस जारी करून बोलावलेल्या या बैठकीस जे नगरसेवक अनुपस्थित राहिले, त्यांच्या भूमिकेबाबत बैठकीत अत्यंत गंभीर चर्चा झाली. पक्षशिस्तीचे थेट उल्लंघन करणाऱ्या या संबंधित अनुपस्थित नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षातीलच काही नगरसेवकांच्या गटाकडून उद्या एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) माध्यमातून प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकृत गटनेत्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, उद्या होणारी ती कथित बैठक पूर्णपणे नियमबाह्य, अवैध आणि असंवैधानिक असून तिचा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी किंवा धोरणांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही अनधिकृत बैठकीपासून दूर राहावे, असे आवाहन अधिकृत गटनेत्यांकडून करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे.
कांग्रेस पक्षाच्या गटबाजीमुळे सध्या नगरसेवक लपंडाव चा खेळ खेळत असल्याचे चित्र आहे, कांग्रेस पक्षाचे नगरसेवक व नेत्यांमुळे हाती आलेली सत्ता गेली, शहरातील समस्या वाढत आहे, मात्र त्यावर सध्या लक्ष देण्याऐवजी पक्षातील नगरसेवकांना या गटातून त्या गटात कसे आणायचे असे प्रयत्न सुरु आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
