बल्लारपूर – House Burglary Ballarpur प्रकरणामुळे बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे. फळ विक्रेता मोहम्मद अस्लम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ७१,५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेनंतर बल्लारशाह पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (बनावट लोन मंजूर करीत लाखोंची फसवणूक)
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीची मोठी घटना समोर आली असून, अज्ञात चोराने एका फळ विक्रेत्याचे बंद घर फोडून ७१,५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद अस्लम शेर मोहम्मद (वय ४० वर्षे, धंदा- फळ विक्रेता, रा. राजेंद्र प्रसाद वार्ड, रमाबाई टिपले यांचे घरी किरायाने, बल्लारपूर) यांनी २४ जून २०२६ रोजी पहाटे दिलेल्या तक्रारीवरून बल्लारशाह पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
House Burglary Ballarpur प्रकरणात नेमके काय घडले?
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी मोहम्मद अस्लम हे आपल्या कुटुंबासह बल्लारपूर येथील राजेंद्र प्रसाद वार्डात भाड्याच्या घरात राहतात आणि शहरात ठेल्यावर फिरून फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी रेहाना अस्लम मोहम्मद यांच्या पोटात आणि कमरेत सतत दुखत असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची सोनोग्राफी करण्यासाठी फिर्यादी हे २२ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून पत्नीसह सरकारी दवाखाना गडचांदूर येथे गेले होते. तिथे रविवारीच सोनोग्राफी होत असल्याचे समजल्यामुळे ते आपल्या सासरवाडीत म्हणजेच बाकर्डी येथे मुक्कामासाठी थांबले. त्यानंतर २३ जून २०२६ रोजी रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास फिर्यादी मोहम्मद अस्लम हे एकटेच जेव्हा बल्लारपूर येथील आपल्या घरी परत आले, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसले आणि दरवाजाची लाकडी पाटी सुद्धा बाजूला काढलेली आढळली.
त्यांनी तात्काळ घरात प्रवेश करून पाहिले असता, स्वयंपाक खोलीत असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा होता आणि आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते तसेच कपाटाचे लॉकरही उघडे होते. त्यांनी याबाबत तात्काळ आपल्या पत्नीला फोनवरून माहिती दिली, ज्यावर पत्नीने कपाटाच्या लॉकरमध्ये एका डब्यात सोन्या-चांदीचे दागिने ठेवल्याचे सांगितले, मात्र तो डबा तिथून गायब होता.
चोरट्याने या घरफोडीत एकूण २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि १०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले आहेत. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ३२,००० रुपये किमतीचे १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ९,६०० रुपयांची ३ ग्रॅमची सोन्याची कर्णफुले, १९,२०० रुपयांची ६ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची पेंडंट असलेली काळी पोत, १,६०० रुपयांची ०.५ ग्रॅमची मुलीची लहान सोन्याची अंगठी, १,६०० रुपयांचे ०.५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले बिरे, ७,००० रुपये किमतीचे १०० ग्रॅमचे चांदीचे चाळ आणि ५०० रुपयांची ७ ग्रॅमची चांदीची अंगठी यांचा समावेश आहे.
हा चोरीचा प्रकार २२ जूनच्या दुपारी ४:०० वाजेपासून ते २३ जूनच्या रात्री ८:४५ वाजेच्या दरम्यान घडला असून, चोरट्याने बंद घराचा कुलूप तोडून घरात प्रवेश करत मौल्यवान दागिने चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच बल्लारशाह पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बिपीन सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्की खुशाल लोखंडे यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






