Sindewahi ACB Trap : सिंदेवाही महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई

सिंदेवाही महावितरण कार्यालयात ३ हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 1, 2026

चंद्रपूर: (Sindewahi ACB Trap) अंतर्गत सिंदेवाही महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या रिलीज ऑर्डरसाठी लाचेची मागणी झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (चंद्रपुरात शिक्षकांची फसवणूक)

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सोलर सिस्टीमचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्याची परवानगी देणारी ‘रिलीज ऑर्डर’ काढून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदेवाही येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदये (वय ३८ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज, १ जुलै २०२६ रोजी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दोन ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टीम बसवून दिली होती. या दोन्ही ग्राहकांचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यासाठी आवश्यक असलेली रिलीज ऑर्डर काढून देण्याच्या कामासाठी सहाय्यक अभियंता अमोद रंदये याने प्रत्येक ग्राहकामागे दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण ४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी १ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे जाऊन या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवली.

Sindewahi ACB Trap : नेमके काय घडले?

तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आजच सिंदेवाही येथील महावितरण कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली आणि सापळा रचला. या पडताळणीदरम्यान आरोपी अमोद रंदये याने रिलीज ऑर्डरच्या कामासाठी ४,००० रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३,००० रुपये स्वतः स्वीकारले. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रंदये याला रंगेहात ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई ला.प्र.वि. नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार, पोलीस हवादार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, महेश माहुरपवार, सचिन गजभिये, महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले, चालक पोलीस शिपाई सतिश सिडाम आणि संदीप कौरासे यांच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment