Ghabad Kund Movie चंद्रपूर पत्रकार परिषदेत दिग्दर्शक आणि कलाकार

चंद्रपूरमध्ये ‘घबाड-कुंड’ चित्रपटाची पत्रकार परिषद; भारतातील पहिल्या मराठी युनिव्हर्स सिनेमाची माहिती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 4, 2026

चंद्रपूर – भारतातील पहिल्या मराठी युनिव्हर्स चित्रपट “घबाड- कुंड”च्या निमित्ताने आज चंद्रपूर येथील प्रेस क्लब, वरोरा नाका येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील आणि चित्रपटातील कलाकार साहिल अन्नलदेवार, वैष्णवी कल्याणकर, टेक्निकल टीम मधून चैतन्य सदाफळ यांनी उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी “घबाड- कुंड” या चित्रपटामागील संकल्पना, कथा, निर्मिती प्रक्रिया आणि चित्रपटातील वेगळेपण याविषयी सविस्तर माहिती दिली. मराठी चित्रपटसृष्टीत नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि उत्कंठावर्धक सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (वेलकम चित्रपटाच्या मालिकेतील हा कॉमेडी चित्रपट कसा आहे)

Ghabad Kund Movie बद्दल दिग्दर्शकांनी काय सांगितले?

चित्रपटातील कलाकार साहिल अन्नलदेवार यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल, चित्रीकरणादरम्यानचे अनुभव आणि कलाकार म्हणून या चित्रपटाचा प्रवास याविषयी माहिती दिली. तसेच चंद्रपूरसारख्या शहरातील प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि पाठबळ हे कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी चित्रपटाच्या कथा, कलाकारांची निवड, चित्रीकरण, आगामी प्रकल्प तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांना दिग्दर्शक आणि कलाकारांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत चित्रपटाशी संबंधित अनेक रंजक गोष्टींची माहिती दिली.

यावेळी उपस्थितांना “घबाड- कुंड” हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन करण्यात आले. मराठी चित्रपटांना आणि स्थानिक कलाकारांना प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणेच भरभरून पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ही पत्रकार परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“घबाड- कुंड” हा चित्रपट सध्या आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित असून, प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment