Brahmapuri Farm Dispute भगवानपूर शेतजमीन वाद प्रकरणातील प्रतिकात्मक दृश्य

ब्रह्मपुरी भगवानपूर शेतजमीन वाद; कोर्टाच्या आदेशानंतर कुंपण उखडले, १५ जणांवर गुन्हा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 4, 2026

ब्रह्मपुरी (चंद्रपूर): Brahmapuri Farm Dispute प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कोर्टाचा आदेश आणि महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत उभारलेले शेताचे कुंपण उखडून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारात महिला शेतकऱ्याचे सुमारे ३.९८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी १५ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. (तो मला व काका-काकूंना त्रास द्यायचा म्हणून त्याला संपवलं)

कोर्टाचा आदेश आणि पोलीस व महसूल प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात शेताभोवती लावलेले सिमेंटचे पोल व तारेचे कुंपण जबरदस्तीने उखडून फेकत तब्बल ३ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील भगवानपूर शेतशिवारात घडली आहे. याप्रकरणी पारडगाव येथील महिला शेतकरी सौ. हर्षा हरीदास ठेंगरी यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी चांदगाव आणि किन्ही येथील आठ नामजद आरोपींसह अन्य ७ अशा एकूण १५ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत थेट शेतात घुसून तोडफोड आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे या भागात तीव्र खळबळ उडाली आहे.

Brahmapuri Farm Dispute प्रकरणात नेमके काय घडले?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी हर्षा ठेंगरी यांचे दीर शरद गणपत ठेंगरी हे भारतीय सैन्य दलात (आर्मी फोर्स) कार्यरत असून, त्यांना सन २००९ मध्ये शासनाकडून भगवानपूर शेतशिवारातील सर्व्हे नंबर १०९/१ पैकी २ हेक्टर शेतीचा पट्टा मिळाला होता, जो सध्या सर्व्हे नंबर १०९/३ म्हणून ओळखला जातो. या जमिनीवरून शेजारील शेतकरी वामन मुकुंदा आंबोने व इतरांसोबत त्यांचा जुना वाद सुरू होता. हा वाद दिवाणी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कायदेशीर मोजणी करून २४ एप्रिल २०२४ रोजी ठेंगरी यांच्या बाजूने निकाल दिला होता. न्यायालयाच्या निकालानंतरही विरोधकांकडून शेतीकामात अडथळा निर्माण केला जात असल्याने, तहसीलदारांच्या आदेशानुसार १८ जून २०२६ रोजी पोलीस प्रशासन, तहसीलदार, आर.आय. आणि तलाठी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत शेताला ताराचे कंपाऊंड करण्यासाठी सुमारे २५० सिमेंटचे पोल गाडण्यात आले होते.

१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी हर्षा ठेंगरी, त्यांच्या सासू वनिता ठेंगरी आणि १० ते १२ महिला मजूर शेतात तूर व सोयाबीनची लागवड करत होत्या. याच दरम्यान जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी वामन मुकुंदा आंबोने, संतोष वामन आंबोने, संदीप रमेश आंबोने, विलास रमेश आंबोने, रमेश आंबोने (सर्व रा. चांदगाव), सौ. ज्योती वसंता कार (रा. ब्रह्मपुरी), गणेश पुंडलिक भर्रे आणि शारदा पुंडलिक भर्रे (दोन्ही रा. किन्ही) यांच्यासह इतर ७ ते ८ पुरुषांनी बेकायदेशीर टोळी बनवून शेतात प्रवेश केला. त्यांनी प्रशासनाने गाडलेले जवळपास २१० सिमेंटचे पोल उपटून खाली पाडले, तसेच शेतातील हायब्रिड तूर आणि सोयाबीनचे बियाणे फेकून देऊन नुकसान केले.

या तोडफोडीत ठेंगरी कुटुंबाचे अंदाजे ३ लाख ९८ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचा मुलगा साहिल मजुरांसह घटनास्थळी पोहोचला असता, आरोपींनी पळ काढला. मात्र पळून जाताना आरोपींनी ‘आजपासून शेतावर आल्यास तुला झाडावर टांगून फाशी देऊन जिवानिशी मारून टाकू’, अशी थेट जिवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर फिर्यादीने ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १८९(२), १९०, २२३, ३२४(५) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला असून, ठाणे प्रभारी प्रमोद गोविंदराव बनबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजेंद्रनाथ जतींद्र मंडल पुढील तपास करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment