Chandrapur Half Marathon मध्ये विजेत्यांचा सत्कार करताना मान्यवर

चंद्रपूर हाफ मॅरेथॉनला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; सचिन यादव विजेता, बाळूभाऊ धानोरकरांना अनोखी मानवंदना

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 5, 2026

चंद्रपूर : Chandrapur Half Marathon अंतर्गत चंद्रपूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत मुंबईच्या सचिन यादवने विजेतेपद पटकावले. हजारो क्रीडाप्रेमी, धावपटू आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्रीडा सोहळा उत्साहात पार पडला.

मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक क्रीडा सोहळा चंद्रपूरच्या भूमीत संपन्न झाला. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘रन फॉर इन्स्पिरेशन, रन फॉर बाळूभाऊ’ या संकल्पनेवर आधारित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. (दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न)

स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार भद्रावती ते पडोली चौक, चंद्रपूर या मार्गावर पार पडलेल्या या ऐतिहासिक धावण्याच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व गर्दी करत मोठा उत्साह दाखवला; तर विशेष आकर्षण म्हणून छोटूलाल सोमलकर यांनी आपल्या वाहनावर तिरंगा लावून या संपूर्ण मॅरेथॉन रॅलीचे अत्यंत दिमाखात नेतृत्व केले.

Chandrapur Half Marathon ला महाराष्ट्रभरातून विक्रमी प्रतिसाद

या चुरशीच्या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या धावपटूंनी आपला कस लावला, ज्यामध्ये खुल्या गटात मुंबईच्या सचिन यादव याने अव्वल स्थान पटकावत १,००,००० रुपयांचे प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक आणि मानाचा किताब आपल्या नावे केला. याच गटात नागपूरच्या राजन यादव याने द्वितीय क्रमांक मिळवून ५१,००० रुपये आणि नागराज खुडसंगे याने तृतीय क्रमांक पटकावून ३१,००० रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले.

महिला स्पर्धकांसाठी ठेवण्यात आलेल्या विशेष बक्षिसांमध्ये चंद्रपूरची साक्षी पोलीजवार हिने प्रथम (१५,००० रुपये), अभिलाषा भगत हिने द्वितीय (१०,००० रुपये) आणि श्रद्धा थोरात हिने तृतीय (५,००० रुपये) क्रमांक पटकावला, तसेच अचल रमेश कंदुकर हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्थानिक खेळाडूंना वाव देण्यासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील स्पर्धकांसाठी जाहीर केलेल्या विशेष पुरस्कारांमध्ये विवेक भगत याने प्रथम (२१,००० रुपये), रितिक ढोडरे याने द्वितीय (११,००० रुपये) आणि यश सातपुते याने तृतीय (७,००० रुपये) क्रमांक मिळवून दिमाखदार कामगिरी केली.

या भव्य क्रीडा महोत्सवाप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती ग्रामीण काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष नरुले, प्रवीण काकडे, नगरसेवक राहुल चौधरी, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पानपट्टीवार, धनुभाऊ गुंडावार, नगरसेविका सरिता सूर, नगरसेवक सुनील नामोजवार, नगरसेविका रेखा खुटेमाटे, नगरसेविका शोभा पारखी, नगरसेविका उर्मिला साव, नगरसेविका आशाताई जाधव, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेवक प्रथमेश गेडाम, कल्पना मत्ते, अर्चना सातपुते, रितेश वाढाई, छोटू धकाते, नितीन सातपुते, मोरेश्वर आवारी, गोपाल अमृतकर, सुयोग भोयर, अतुल वाघमारे, मनीष दास आणि दीक्षा सातपुते, राहुल तायडे यांसह राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. हा उपक्रम जिल्ह्यातील व राज्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि आरोग्याविषयी जागरूक राहण्यासाठी मोठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला एक नवा आयाम देणाऱ्या या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंच्या राहण्याची व सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. मराठा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले व त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या मॅरेथॉनने चंद्रपूरच्या क्रीडा जगतात एक नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. सूत्रसंचालन मोंटू सिंग, कोविल मडावी यांनी केले.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment