घुग्घुस ट्रक अपघात: शेनगाव येथील अपघातस्थळ

दिवाळीपूर्वी तीन कुटुंबांवर शोककळा, घुग्घुसमध्ये अपघात, तिघांचा मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 6, 2026

घुग्घुस: घुग्घुस ट्रक अपघात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) पहाटे सुमारे ४.४५ वाजता घडला. घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील शेनगाव येथील सपरा पेट्रोल पंपाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांचा मृत्यू झाला. दोघांचा जागीच, तर एकाचा चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वेकोलि कार्यालयात चाकू हल्ला, वाचा बातमी)

घुग्घुस ट्रक अपघात कसा घडला?

घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील शेनगाव येथील सपरा पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (६ नोव्हेंबर) पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिघेही युवक एकाच दुचाकीने प्रवास करत असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी आरोपी चालकाची ओळख पटवून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अपघात इतका भीषण होता कि मृतकाचे दुचाकी चक्काचूर झाली होती.

दिवाळीसाठी गावी निघाले होते, घुग्घुस ट्रक अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर सध्या लॉईड्स मेटल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू असल्यामुळे चंद्रपूरकडून घुग्घुसकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे घुग्घुस ते चंद्रपूर या एकाच मार्गावरून दुतर्फा (दोन्ही बाजूंची) वाहतूक सुरू होती.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोतेकसा येथील रहिवासी जयदीप श्रीराम हलामी आणि तनेश्वर कुमारसाय नांग हे आपल्या साथीदारासह गोपाल बुधाराम नैताम (रा. आंबागड चौकी, मानपूर क्षेत्र, जिल्हा – छत्तीसगड) यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (MH-33-AJ-9969) ने घुग्घुसवरून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. हे तिघेही युवक दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी निघाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांची पुढील कारवाई, घुग्घुस ट्रक अपघात

दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जयदीप श्रीराम हलामी आणि तनेश्वर कुमारसाय नांग यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोपाल नैताम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी ट्रकचालकाची ओळख पटली अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत आरोपी ट्रकचालकाची ओळख पटवली आहे. आरोपी चालकाचे नाव धर्मेंद्र उमराव प्रजापती (वय ३७ वर्ष) असे असून तो पंकज झा ट्रान्सपोर्ट, पडोली येथे चालक म्हणून कार्यरत आहे. आरोपी मूळचा एकडला, तहसील खागा, जिल्हा फतेहपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. घुग्घुस पोलीस या अपघातासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई व तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “दिवाळीपूर्वी तीन कुटुंबांवर शोककळा, घुग्घुसमध्ये अपघात, तिघांचा मृत्यू”

Leave a Comment