संत नागाजी महाराज जयंती, इंदिरानगर

संत नागाजी महाराजांची शिकवण आजही प्रेरणादायी – आमदार किशोर जोरगेवार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 14, 2026

चंद्रपूर –  संत नागाजी महाराज जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथे नाभिक कल्याण समितीच्या वतीने जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांनी संत नागाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले. उपस्थित समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. संतांचे विचार केवळ जयंतीपुरते न ठेवता आचरणात आणणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशी भावना आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली. (चंद्रपुरात रोकडे ज्वेलर्सच्या सवलतीची धूम, goat सवलत आता १५ नोव्हेम्बर पर्यंत, वाचा बातमी)

संत नागाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन

संतांचे विचार हे समाजाला योग्य दिशा देणारे आणि माणुसकीची शिकवण देणारे असतात. संत नागाजी महाराज यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांनी दिलेली समता, सद्भावना, सेवा आणि समाजहिताची शिकवण आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाने एकोप्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथे संत नागाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाभीक कल्यान समीतीच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी संत नागाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले आणि विनम्र अभिवादन केले. उपस्थित समाजबांधवांना जयंती महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

    यावेळी समीतीचे अध्यक्ष शंकराव नक्षिणे, सचिव दिनेश दहिवलकर, प्रेमलाल कडूकर, मनोहर कडूकर, अनिल बडवाईक, मोरेश्वर नागपूरे, ईश्वर लाखडे, रत्नाकर चौधरी, नारायन आसकर आदिंची प्रामख्यतेने उपस्थिती होती.

     संत नागाजी महाराज यांनी आपल्या विचारांतून समाजाला समता, बंधुता, सद्भावना आणि सेवाभावाचा संदेश दिला. समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागावे, समाजहिताला प्राधान्य द्यावे, ही त्यांची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आजही समाजबांधव विविध सामाजिक उपक्रमांतून आपले योगदान देत आहेत. संतांचे विचार केवळ जयंती उत्सवापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

    या जयंती महोत्सवाला मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात हा महोत्सव साजरा करण्यात आला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment