वरोरा – वरोरा स्प्रिंकलर चोरी प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील मौजा शेंबळ शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या शेतातील ६७,५०० रुपयांचे सिंचन साहित्य चोरीस गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
वरोरा स्प्रिंकलर चोरी कशी उघडकीस आली?
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा शेंबळ शेतशिवारात चोरीची एक मोठी व खळबळजनक घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल नऊ शेतकऱ्यांच्या शेताला लक्ष करत सिंचनासाठी वापरले जाणारे शेकडो स्पिंकलर आणि साहित्य लांबवल्याची घटना समोर आली आहे. या सामूहिक चोरीमुळे शेतशिवारात भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वेकोलि कर्मचाऱ्याच्या घरी घरफोडी, वाचा बातमी)
सकाळी पाणी देण्यासाठी गेल्यावर चोरी लक्षात आली, वरोरा स्प्रिंकलर चोरी
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हा सर्व प्रकार १४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजतापासून १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडला. वरोरा पोलीस ठाण्यापासून दक्षिण दिशेला सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा शेंबळ शेतशिवारात ही घटना घडली. तक्रारदार विठ्ठल लटारी घागी (वय ५२ वर्षे, रा. शेंबळ, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांनी यासंदर्भात वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी फिर्याद दिली आहे. तक्रारदार विठ्ठल घागी यांची शेंबळ शेतशिवारात १० एकर स्वमालकीची शेती असून सध्या त्यांच्या शेतात चण्याचे पीक डोलत आहे. या पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी जैन कंपनीचे ८ नग स्पिंकलर शेतात लावले होते.
शेजारच्या शेतांतही साहित्य गायब, वरोरा स्प्रिंकलर चोरी
रोजच्याप्रमाणे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल घागी हे आपल्या शेतात पाणी देण्याच्या उद्देशाने गेले असता, त्यांना शेतात बसवलेले स्पिंकलर दिसून आले नाहीत. जैन कंपनीचे ५,६०० रुपये किमतीचे हे ८ नग स्पिंकलर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या शेतांची पाहणी केली असता, त्यांच्या शेतालगत एकामागे एक रोडच्या लगत असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या शेतातीलही सिंचन साहित्य गायब असल्याचे समोर आले.
कोणत्या शेतकऱ्यांचे किती नुकसान?, वरोरा स्प्रिंकलर चोरी
चोरट्यांनी केवळ एकाच शेतकरी नव्हे तर परिसरातील तब्बल ९ शेतकऱ्यांच्या शेताला लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये निलेश देवराव मिलमिले यांच्या शेतातील ६ नग स्पिंकलर (किंमत ४,२०० रुपये), सुभाष सखाराम भेंडाळे यांच्या शेतातील ७ नग स्पिंकलर (किंमत ४,९०० रुपये), महादेव पांडुरंग जिवतोडे यांच्या शेतातील १२ नग जुने स्पिंकलर (किंमत ४,५०० रुपये), तसेच करंजी येथील शेतकरी भगवान निलकंठ पारोधे यांच्या शेतातील १० नग स्पिंकलर (किंमत ७,००० रुपये),
संदीप विकास कष्टी यांच्या शेतातील १४ नग स्पिंकलर (किंमत ९,८०० रुपये), रामदास पांडुरंग गाडगे यांच्या शेतातील ११ नग स्पिंकलर (किंमत ७,७०० रुपये), यादव दत्तु पारोधे यांच्या शेतातील ७ नग स्पिंकलर (किंमत ४,९०० रुपये), भारत दशरथ बदकी यांच्या शेतातील १२ नग स्पिंकलर (किंमत ८,४०० रुपये) आणि करंगवान शेतशिवारातील सुरेश सिताराम पायधन यांच्या शेतातील नोजल पाईपसह १५ नग स्पिंकलर (किंमत १०,५०० रुपये) असा एकूण ६७,५०० रुपयांचा शेतीोपयोगी ऐवज अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लांबवला आहे.
बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा, वरोरा स्प्रिंकलर चोरी
या प्रकरणी विठ्ठल लटारी घागी यांनी वरोरा पोलीस ठाण्यात गाठून तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी तात्काळ दखल देत गुन्हा नोंदवून घेतला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत माधवराव गौरकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाशराव शमराव सोन्टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. ऐन रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्याच्या मोक्यावरच सिंचनाचे साहित्य चोरीस गेल्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







