बनावट कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपरचे प्रातिनिधिक छायाचित्र, ब्रम्हपुरी बनावट सह्या प्रकरण

ब्रम्हपुरीत वडिलोपार्जित जमिनीसाठी बहिणींच्या बनावट सह्या, भावावर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 17, 2026

ब्रम्हपुरी, दिनांक १७ नोव्हेंबर: ब्रम्हपुरी बनावट सह्या प्रकरणात वडिलोपार्जित जमिनीसाठी बहिणींच्या नकळत संमतीपत्र तयार केल्याच्या आरोपावरून भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता सांगरे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली. फवारा चौक परिसरातील ३६८.९८ चौरस मीटर जमिनीशी हे प्रकरण संबंधित आहे. बी.एन.एस. कलम ३१८(२), ३३५, ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये तपास सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (बनावट सह्या) शहरात वडीलोपार्जित संपत्तीत बहिणींना डावलून आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी चक्क बहिणींच्या खोट्या सह्या व बनावट दस्तऐवज तयार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ब्रम्हपुरी शहरातील फवारा चौक परिसरातील मोक्याची वडीलोपार्जित जमीन बळकावण्याच्या उद्देशाने बहिणींच्या नकळत बनावट संमतीपत्र तयार करून नोटरी करणाऱ्या राहुल नारायण शेटिये या भावाविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बी.एन.एस.) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपूर बस स्थानकावर लाखोंचे दागिने लंपास, वाचा बातमी)

ब्रम्हपुरी बनावट सह्या प्रकरण नेमके काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती संगीता संतोष सांगरे (वय ४८ वर्षे, रा. आझाद चौक, वार्ड क्र. ०३, सिंदेवाही, जि. चंद्रपूर) यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संगीता सांगरे व त्यांच्या चार बहिणी (पिंकी आकाश वैश्य, रा. बालाघाट; सुनिता सुनिल ठाकुर, रा. जबलपूर; सेजल ललीत बडघरे, रा. रायपूर आणि दिपा विशाल मुजारीया, रा. नागपूर) तसेच आरोपी भाऊ राहुल नारायण शेटिये (रा. फवारा चौक, ब्रम्हपुरी) असे सर्वजण मिळून पाच बहिणी आणि एक भाऊ आहेत.

त्यांचे वडील नारायणसाव गणेशसाव शेटिये यांच्या नावावर ब्रम्हपुरी येथील फवारा चौकात शीट नं. १२, नगर भूमापन नं. १३५६, नगर परिषद मालमत्ता नं. ११९७/६ अ मधील एकूण क्षेत्रफळ ३६८.९८ चौ.मी. असलेली वडीलोपार्जित जमीन होती. सन १९९५ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर सन २००३ मध्ये त्यांची आई व सर्व सहा भावंडांच्या नावावर वारसाहक्क नोंदविण्यात आला असून, या जमिनीवर सर्व बहिणींचा समान व सामायिक हक्क आहे.

ब्रम्हपुरी बनावट सह्या चा प्रकार नगर परिषदेच्या फोनने उघड झाला

दरम्यान, गत २४ मे २०२६ रोजी ब्रम्हपुरी नगर परिषदेतून फिर्यादी संगीता सांगरे यांना फोन आला की, तुमच्या वडीलोपार्जित जमिनीसंदर्भात नगर परिषदेत संमतीपत्र प्राप्त झाले असून तुम्ही कार्यालयात उपस्थित राहावे. या फोननंतर सर्व बहिणींनी ब्रम्हपुरी नगर परिषदेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांचा लहान भाऊ राहुल नारायण शेटिये याने इतर सर्व बहिणींच्या कोणत्याही प्रकारच्या पूर्वपरवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय, बहिणींच्या नावाने खोट्या व (ब्रम्हपुरी ) बनावट सह्या करून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी वकील प्रवीण एस. चिंतावार यांच्यामार्फत बनावट संमतीपत्र तयार करून घेतले असल्याचे समोर आले. बहिणींना मालमत्तेच्या हक्कापासून वंचित ठेवून त्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने हा बनावट दस्तऐवज तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

ब्रम्हपुरी पोलिसांत गुन्हा दाखल, ब्रह्मपुरी बनावट सह्या

वडीलोपार्जित संपत्ती बळकावण्यासाठी स्वतःच्याच बहिणींची फसवणूक करून बनावट सह्या व कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी संगीता सांगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपी राहुल नारायण शेटिये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३३५, ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार भारत येरमे हे करीत असून, या प्रकारामुळे मालमत्तेच्या वादातून भावंडांमध्येच बनावटगिरी झाल्याने ब्रम्हपुरी शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment