चंद्रपूर तरुणी पाठलाग प्रकरणाचा तपास करणारे रामनगर पोलीस ठाणे

कुटुंबीयांवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, सततच्या त्रासाला कंटाळून तरुणी पोलिसांत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 24, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर तरुणी पाठलाग प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे; शिवाजी नगर परिसरातील २३ वर्षीय तरुणीने तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नदीम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमांखाली कारवाई केली आहे. आरोपीने मारहाण केली आणि कुटुंबीयांवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली, असा तक्रारीत आरोप आहे. पुढील तपास सुरू आहे. (आयटीआय प्राचार्याने मागितली लाच, एसीबीने केली कारवाई, वाचा बातमी)

चंद्रपूर तरुणी पाठलाग प्रकरणात तक्रारीत काय म्हटले आहे?

पीडित तरुणी ही चंद्रपुरातील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते आणि शिक्षण घेत आहे. नदीम शेख हा तरुण परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत नदीम शेख याने १० ऑक्टोबर २०२१ पासून तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधूनमधून बोलण्याचा प्रयत्न करणे आणि जिथे भेटेल तिथे बोलण्याचा आग्रह धरणे, असे प्रकार सुरू असतानाच तणाव वाढत गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी आरोपीने तरुणीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा तसेच तुझ्या कुटुंबीयांवर अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर ३० जून २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास तरुणी एका हॉटेलसमोरून जात असताना आरोपी तिच्याजवळ आला आणि अश्लील शिवीगाळ करत तू का भेटत नाहीस, अशी विचारणा करून तिला पुन्हा धमकावले. याशिवाय, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान आरोपीने पुन्हा एकदा, ज्या दिवशी माझा संयम संपेल त्या दिवशी सर्व काही उद्ध्वस्त करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (चंद्रपूर तरुणी पाठलाग)

या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून तरुणीने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार अर्ज दिला. या तक्रारीची दखल घेत २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपी नदीम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे), २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा शिवीगाळ करणे), ३५१(२) आणि ३५१(३) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार राहुल प्रभाकर सहारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. (चंद्रपूर तरुणी पाठलाग)

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment