चंद्रपूर घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाशी संबंधित पोलीस कारवाईचे छायाचित्र.

घराची चावी बाथरूमच्या खिडकीवर; कपाटातील ६० हजारांची चोरी, चंद्रपूर LCB ने आरोपीला घेतले ताब्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 29, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आकाश दिलीप नवघरे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. बाथरूमच्या खिडकीवर ठेवलेल्या घराच्या चावीचा वापर करून कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. (चंद्रपुरात टोळीयुद्ध, एकाची हत्या, वाचा सविस्तर)

चंद्रपूर घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा

बाथरूमच्या खिडकीवर ठेवलेली घराची चाबी घेऊन कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छडा लावला असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आकाश दिलीप नवघरे (वय २८, रा. दानववाडी, बिमलगोटे, चंद्रपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी सौ. कौशल्या जगदीश पिसे (वय ५०, धंदा मजुरी, रा. बिनबा गेट, दानववाडी, सेन प्रायजेश स्कूलजवळ, चंद्रपूर) या गेल्या तीन ते चार वर्षांपासून दिलीप नवघरे यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास असून, आपला मुलगा पंकज पिसे याच्यासोबत मजुरीचे काम करतात. कामावर जाताना त्या नेहमीप्रमाणे घराच्या दरवाजाला कुलूप लावून घराची चाबी बाथरूमच्या खिडकीवर ठेवून जात असत. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी गोदरेजच्या कपाटातील आतील लॉकरमध्ये ३० हजार रुपये रोख आणि अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण ६० हजार रुपयांचे साहित्य सुरक्षित ठेवले होते. लॉकरची चाबी त्यांनी कपाटातच ठेवली होती.

यानंतर २५ व २६ नोव्हेंबर रोजी कपाट उघडण्यात आले नव्हते. दरम्यान, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता सौ. पिसे आणि त्यांचा मुलगा पंकज हे नेहमीप्रमाणे बाथरूमच्या खिडकीवर चाबी ठेवून कामावर गेले. दुपारी तीन वाजता त्या कामावरून घरी परतल्या आणि त्यांनी बाथरूमच्या खिडकीवरील चाबीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांनी कपाट उघडून पाहिले असता, लॉकरची चाबी कपाटातील साड्यांवर पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी लॉकर उघडले; मात्र आतील ३० हजार रुपये रोख आणि ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.१० वाजता अपराध क्रमांक ११३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून आरोपी आकाश दिलीप नवघरे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पिवळ्या धातूचे ०२ डोरले आणि ४६ गोल मणी असा अंदाजे ७ ग्रॅम वजनाचा, एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment