Chandrapur district : चंद्रपुरात लवकरचं हवाई सेवा सुरू होणार

Chandrapur district सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामांसंदर्भात आढावा घेत असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मुर्ती येथे प्रस्तावित विमानतळाच्या कामासंदर्भात खासदार धानोरकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. किंजरापू राममोहन नायडू यांची दिल्ली येथे भेट घेतली.

लाचखोर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढोणा गावातील शाळेत मुख्याध्यापकाला लिपिकाने मागितली लाच

Chandrapur district चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच विमानतळ व्हावे या मागणीसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी सरकार च्या काळात केंद्र सरकार कडे मागणी केली होती. त्यासंदर्भात कार्यवाही सुरु झाली असून प्रस्तावित विमानतळाला लागणाऱ्या 840 एकर जागेपैकी 700 एकर जागेचे भुमी अधिग्रहण झाले असून उर्वरीत जागेचे तात्काळ भुमी अधिग्रहन करुन मुर्ती विमानतळाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या कडे केली.

त्यासोबतच मोरवा विमानतळाच्या रनवे 700 मीटर पर्यंत वाढवून हवाई सेवा सुरु करण्याची मागणी देखील यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असल्याने हवाई मार्ग सुखकर व्हावा यासाठी सदर विमानतळाचे काम त्वरीत पुर्ण करावे. यासंदर्भाने देखील खासदार धानोरकर यांनी चर्चा केली. यासंदर्भात माहिती घेऊन लवकरच निर्णय घेणार असल्याचे विमान वाहतुक मंत्री श्री. किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितले.

योजना – लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्यावर प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे, यापूर्वी सुद्धा त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्येबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. आता हवाई सेवेचा प्रश्न निकाली लागल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना नक्की होणारचं.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!