Police Crackdown: चंद्रपुरात अवैध धंद्यांवर धडक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर: Police Crackdown अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने मे 2026 महिन्यात अवैध धंद्यांविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, अवैध जनावरांची वाहतूक, अमली पदार्थ, रेती चोरी आणि प्रतिबंधित तंबाखू विक्री अशा विविध गुन्ह्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. (विना रॉयल्टी रेतीची वाहतूक, एलसीबी ची कारवाई)

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे माहे मे २०२६ मध्ये एक व्यापक आणि धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलीस प्रशासनाने दारूबंदी, जुगार, अवैध जनावरांची वाहतूक, अमली पदार्थ आणि रेती चोरी यांसारख्या विविध गंभीर गुन्ह्यांवर कडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Police Crackdown अंतर्गत 584 दारूबंदी गुन्हे उघड

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या एका महिन्यात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवत पोलिसांनी एकूण ५८४ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यात तब्बल ४५ लाख ९० हजार ५९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय, हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व तिची विक्री करणाऱ्या समाजकंटकांवर ४६ कारवाया करून ६ लाख ५९ हजार ३६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जुगाराच्या अड्ड्यांवर टाकलेल्या धाडींमध्ये ९० गुन्हे दाखल करून ९ लाख ७ हजार ३ रुपये जप्त करण्यात आले. पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध अत्यंत कडक पावले उचलत पोलिसांनी २७ कारवाया केल्या आणि या कारवाईत ३ कोटी ३४ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीची अवैध रेती आणि वाहने जप्त करण्यात आली.

गोवंशीय जनावरांचा छळ आणि त्यांच्या अवैध वाहतुकीविरुद्ध देखील पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करून १ कोटी २७ लाख १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईदरम्यान १३७ जनावरांची सुटका करण्यात आली, १३ वाहने जप्त करण्यात आली आणि ७० किलो मांस जप्त करण्यात आले. तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या ड्रग्ज तस्करांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) २१ गुन्हे नोंदवून एकूण १८ लाख ७८ हजार ५६८ रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा ६.२४१ किलो गांजा, १३ लाख ९९ हजार ५०० रुपये किमतीचे १३०.९९ ग्राम एम.डी. (MD) आणि ९ हजार ६८ रुपये किमतीचे २.२६७ किलोग्राम डोडा पावडरचा समावेश आहे.

चोरी व इतर कायदेविषयक कारवायांमध्ये मोटार सायकल चोरीचे १० गुन्हे उघड करून ४ लाख ३ हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या, तर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर १२ कारवाया करत १७ लाख ३४ हजार ६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत (COPTA Act) १४४ गुन्हे नोंदवून २८ हजार ८०० रुपयांचा दंड व मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर हत्यार कायद्यांतर्गत (Arms Act) ९ कारवाया करून ८ हजार ५०० रुपये किमतीची शस्त्रे जप्त करण्यात आली, ज्यामध्ये २ भरमार बंदुका, १ पिस्तुल, ६ तलवारी, १ चाकू आणि १ खंजर पोलिसांच्या हाती लागला आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलीस दल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही अवैध धंदे, बेकायदेशीर दारू विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, अशी ग्वाही देखील पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Comment