ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : Brahmapuri Crime News ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा बोढेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी आणून ठेवलेले महागडे लोखंडी साहित्य अज्ञात चोराने लंपास केले आहे. बांधकामाच्या जागेवरून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – पूजेच्या नावाखाली भोंदू बाबाचा विवाहितेवर अत्याचार)
या प्रकरणी कंत्राटदाराच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील कंत्राटदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Brahmapuri Crime News : बोढेगाव येथे पाण्याच्या टाकीचे साहित्य चोरीला
ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा बोढेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी आणून ठेवलेले हजारो रुपयांचे लोखंडी साहित्य अज्ञात चोराने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बांधकाम ठेकेदाराच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी घेतले होते पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे कंत्राट
चिचोली (ता. ब्रह्मपुरी) येथील रहिवासी असलेले ५५ वर्षीय बांधकाम ठेकेदार श्रीहरी जनार्धन लांगडे यांनी दोन वर्षांपूर्वी मौजा बोढेगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे कंत्राट घेतले होते. या बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य भंडारा येथील कंत्राटदार विजय पोहरकर यांनी पाठवले होते. हे साहित्य सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेकेदार लांगडे यांनी बोढेगाव येथील त्यांचे सासरे ऋषी शंकर रामटेके यांच्या घराच्या जिन्याखाली एप्रिल २०२५ मध्ये साठवून ठेवले होते.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत हे सर्व साहित्य जागेवरच होते. मात्र ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सासरे रामटेके यांना जिन्याखालील साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी करून तातडीने जावई श्रीहरी लांगडे यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. लांगडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तिथले प्लास्टिकचे साहित्य जसेच्या तसे होते, मात्र लोखंड आणि बिडाचे महागडे साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
२९ ऑगस्टच्या रात्री ११:३० ते ३० ऑगस्टच्या सकाळी ६:०० या कालावधीत अज्ञात इसमाने हे साहित्य चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये १२ हजार रुपये किमतीचे १०० एमएमचे ५ स्लुईस व्हॉल्व्ह, ३ हजार ५०० रुपयांचा १ स्लुईस व्हॉल्व्ह, २ हजार ४०० रुपयांचे १०० एमएम सीआय फ्लँजचे १२ नग, ६०० रुपयांचे १५० एमएम एमएस फ्लँजचे २ नग आणि २४० रुपयांचे १०० एमएम फ्लँजचे १२ नग असा एकूण १८ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी श्रीहरी लांगडे यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तोंडी तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे ठाणे प्रभारी अधिकारी प्रमोद बाणबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार मिलिंद नाईतम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






