शंकरपूर / चिमूर (चंद्रपूर) : Dhongi Maharaj Crime गृहशांती आणि कालसर्प दोष निवारण पूजेच्या बहाण्याने २७ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. (हे हि वाचा – KPCL खाणीत वृक्षतोड, ६ जणांना अटक)
या गंभीर प्रकरणात भिसी पोलिसांनी मुख्य संशयित ढोंगी महाराज आणि त्याच्या दोन साथीदारांना तात्काळ अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने आपबिती सांगताच संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपींना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
घरगुती गृहशांती आणि कालसर्प दोष निवारणासाठी पूजेचे ढोंग रचून एका २७ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी भिसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य संशयित ढोंगी महाराज आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
शुभम लटारी खंगार (वय २६, रा. मसाडा, ता. वरोरा), सचिन परमेश्वर मोडक (वय २८, रा. चिखल वानोजा, ता. वरोरा) आणि तेजस गुंडेराव वालकटे (वय २४, रा. उमरेड, जि. नागपूर) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार विवाहितेच्या पतीची प्रकृती सातत्याने अस्वस्थ राहत असल्याने, कौटुंबिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि कालसर्प दोष निवारणासाठी त्यांनी जगन्नाथ महाराज भद्रभेष देवस्थानचा तथाकथित महाराज शुभम खंगार याच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार रविवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी शुभम महाराज हा त्याचे साथीदार सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांना सोबत घेऊन पीडितेच्या घरी पूजा करण्यासाठी आला.
पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार
घरात पूजेचा विधी सुरू असताना आरोपीने कपाळावर बोट ठेवणे आणि लिंबू ओवाळणे यांसारखे प्रकार केले. विधीच्या दरम्यान त्याने पुढील पूजेचे साहित्य जसे की आरतीचे ताट, लिंबू आणि बोरीचे काटे आणण्याच्या बहाण्याने पीडितेच्या पतीला घराबाहेर पाठवले. पती बाहेर जाताच बाहेर थांबलेल्या सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांनी बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला व पतीला आत येण्यास रोखले.
त्यानंतर आतून दरवाजा बंद करून शुभम खंगार याने पीडितेला “तुझ्या पतीला मारून टाकेन” अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
नातेवाइकांनी पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने तात्काळ घडलेला सर्व प्रकार बाहेर येऊन पती व नातेवाइकांना सांगितला. संतापलेल्या नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळावरून तिन्ही आरोपींना पकडून थेट भिसी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मुळे या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






