महाराष्ट्र शासन – : POP Idol Immersion Rules पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विसर्जनाबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आता उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत लागू राहतील. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने १ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे नवीन परिपत्रक जारी केले आहे.
या नियमांनुसार ६ फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत.
POP Idol Immersion Rules : उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत नियमावली लागू
पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या अनुषंगाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विसर्जनाबाबत राज्य शासनाने १ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहतील, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने १ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. (हे हि वाचा – अस्थायी पदांना मुदतवाढ)
मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका (क्र. ९६/२०२४) आणि इतर याचिकांवर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने ऑगस्ट २०२६ मध्ये अंतरिम आदेश दिले आहेत. न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत २४ जुलै २०२५ रोजीचे अंतरिम आदेश अंमलात राहणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने १ ऑगस्ट २०२५ रोजी निर्गमित केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासन निर्णयाची प्रत डाउनलोड करामार्गदर्शक तत्त्वांचे ठळक नियम :
- लाल रंगाचे चिन्ह व नोंदवही : पीओपी मूर्तींच्या मागील बाजूस ऑईल पेंटने लाल रंगाचे गोल चिन्ह करणे उत्पादक व विक्रेत्यांवर बंधनकारक असून विक्रीची नोंदवही ठेवणे आवश्यक आहे.
- ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन : घरगुती तसेच ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच करावे लागेल. यासाठी स्थानिक संस्थांनी पुरेशा कृत्रिम तलावांची व्यवस्था उभारणे बंधनकारक आहे.
- मोठ्या मूर्तींबाबत नियम : ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या सार्वजनिक मूर्तींसाठी पर्याय नसल्यास नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी असेल; मात्र विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी स्थानिक प्रशासनाने सर्व साहित्याचे संकलन करून शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी.
- गाळ व पाण्याचे शुद्धीकरण : कृत्रिम तलावातील पाण्यावर चुना किंवा तुरटीच्या साहाय्याने ७ दिवसांत प्रक्रिया करावी आणि गाळाची १५ दिवसांपर्यंत पर्यावरणपूरक साठवणूक करून पुनर्वापर करावा.
या नियमांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश पर्यावरण विभागाने दिले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






