Chandrapur Court Fee Stamps

चंद्रपूर जिल्ह्यात ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा प्रश्न सुटला; आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 12, 2026

चंद्रपूर : (Chandrapur Court Fee Stamps) संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून भासत असलेला ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा अखेर दूर झाला आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे जिल्ह्यातील वकील, कारकून आणि कोर्टात येणाऱ्या शेकडो सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात डीजे बंद)

Chandrapur Court Fee Stamps: अनेक वर्षांची मोठी समस्या अखेर सुटली

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून भासत असलेल्या ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांच्या तुटवड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला यश आले आहे. वकील, त्यांच्या कारकूनांसह सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. त्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करत चंद्रपूर जिल्हाभर ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांची उपलब्धता सुनिश्चित केली आहे.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा जाणवत होता. परिणामी, अनेक अर्जांवर आवश्यक असलेले ५ रुपयांचे तिकीट उपलब्ध नसल्यामुळे नागरिक, वकील आणि इतर विधी व्यावसायिकांना १० रुपयांची कोर्ट फी वापरण्याची वेळ येत होती. त्यामुळे अनावश्यक आर्थिक भार आणि गैरसोयीचा त्यांना सामना करावा लागत होता.

या समस्येची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यास ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा पुरेसा पुरवठा करण्याची विनंती केली. त्यांच्या पत्राची तातडीने दखल घेत नोंदणी महानिरीक्षकांनी जिल्हा मुद्रांक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलत ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांची जिल्हाभर उपलब्धता सुनिश्चित केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला प्रश्न मार्गी लागला असून, वकील, विधी व्यावसायिक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामुळे जिल्हा न्यायालयातील शेकडो वकील, वकिलांचे कारकून, इतर विधी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय झाली आहे. ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अॅड. योगेश्वर पचारे यांनी सर्व वकिलांच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. जनतेच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करून परिणामकारक कार्यवाही घडवून आणणे, ही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची आणखी एक प्रचिती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment