चंद्रपूर : चंद्रपूर दुष्काळग्रस्त तालुके यादीतून जिवती, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी हे तीन तालुके वगळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.
या तालुक्यांत तात्काळ प्रत्यक्ष पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठवले आहे. तिन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी नमूद केले. (चंद्रपूर शहरातील गायबी होणारा रस्ता, वाचा हि बातमी)
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यामुळे येथील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. या तालुक्यांमध्ये तात्काळ प्रत्यक्ष पंचनामे करून त्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे आणि बळीराजाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
चंद्रपूर दुष्काळग्रस्त तालुके: तीन तालुके यादीतून कसे वगळले?
मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना दिलेल्या पत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नमूद केले की, चंद्रपूर जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून जिवती, बल्लारपूर व ब्रह्मपुरी हे तीन तालुके वगळण्यात आले आहेत. यासाठी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे तांत्रिक कारण दिले जात आहे. वास्तविक पाहता, यावर्षी सर्वत्र समान पाऊस झालेला नाही. अवघ्या ५०० मीटरच्या अंतरावर एका भागात पाऊस पडत असताना लगतच्या दुसऱ्या भागात पाऊस गायब असल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ पर्जन्यमापन यंत्रणेच्या मर्यादित तांत्रिक नोंदींवरून संपूर्ण तालुक्याची परिस्थिती ठरवणे हे शेतकरीहिताच्या दृष्टीने अत्यंत अन्यायकारक आहे.
पर्जन्यमापन केंद्राच्या या तांत्रिक आकडेवारीमुळे स्थानिक शेतकरी मदतीपासून वंचित राहत असून अनेक भागात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ पर्जन्यमापन केंद्राच्या आकडेवारीवर न थांबता जिवती, बल्लारपूर व ब्रह्मपुरी या तिन्ही तालुक्यांतील सर्व बाधित भागात तात्काळ प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत आणि या तिन्ही तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






