चंद्रपूर अग्निसुरक्षा गुन्हा प्रकरणातील रघुवंशी कॉम्प्लेक्स इमारतीचा बाह्य भाग

रगुवंशी कॉम्प्लेक्स आग प्रकरणी इंडियन मेडिकोज एजन्सी वर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 29, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर अग्निसुरक्षा गुन्हा प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला आहे. रघुवंशी कॉम्प्लेक्समधील एका मेडिकल एजन्सीत ९ सप्टेंबर २०२६ रोजी आग लागली होती. त्यानंतर अग्निसुरक्षा उपाययोजनांचे पालन न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

FIR नुसार, आस्थापनेत पाण्याची उपलब्धता, आग सूचना प्रणाली आणि आपत्कालीन निर्गमन यांबाबत त्रुटी नमूद आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गत २४ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदला गेला. पुढील तपास सुरू आहे. (चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर, वाचा अपघाताची बातमी)

चंद्रपूर अग्निसुरक्षा गुन्हा नेमका कोणत्या कारणावरून?

रघुवंशी कॉम्प्लेक्स, चंद्रपूर येथील इंडियन मेडिकोज एजन्सी (प्रो. प्रा. कमलेश पाजणकर) यांच्या आस्थापनेत दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी आग लागण्याची घटना घडली. या घटनेच्या अनुषंगाने अग्निसुरक्षा उपाययोजनांचे पालन न केल्याच्या कारणावरून चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR मध्ये नमूद केलेल्या अग्निसुरक्षा त्रुटी

FIR नुसार, सदर आस्थापनेमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित आवश्यक उपाययोजना पूर्ण नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये पाण्याची उपलब्धता नसणे, फायर अलार्म प्रणाली कार्यरत नसणे, Emergency Exit योग्य स्थितीत नसणे, मार्ग मोकळा नसणे, इमर्जन्सी फायर एक्झिट ब्लॉक असणे, तसेच अग्निशमन उपकरणांची योग्य देखभाल व उपलब्धतेबाबत त्रुटी आढळल्याचे नमूद आहे.

तसेच, आस्थापनेत रासायनिक पदार्थ साठविण्याच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसणे, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक उपलब्ध नसणे आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या साठवणुकीबाबत आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना न केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ३, ४, ६, ७, ८ व ३६ अन्वये चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात FIR क्रमांक ०९५९/२०२६ दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपती तुकाराम वढाई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment